Mumbai News : तुम्ही राजकीय व्यक्ती आहात किंवा राजकारणाशी संबंधित असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. राजकीय व्यक्तींची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांत स्पष्टता आणली आहे. याचा फायदा देशातील राजकारणाशी संबंधित कोट्यवधी लोकांना होणार आहे.
राजकीय व्यक्ती आणि राजकारणाशी संबंधित लोकांना कर्ज घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. याबाबत असलेल्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्याने अनेकांना कर्ज दिले जात नसे किंवा कर्ज मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राजकारणाशी संबंधित (Politically-Exposed Persons - PEPs) व्याख्येत सुधारणा केली आहे.
यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2016 रोजी केवायसी नियमात (KYC Rule) लावलेले एक उपकलम रिझर्व्ह बँकेने काढून टाकले आहे. एवढेच नाही, तर या बदलाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिली आहे. यामुळे राजकीय व्यक्ती आणि राजकारणाशी संबंधित व्यक्तींना कर्ज मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खुद्द रिझर्व्ह बँकेने लक्ष घालून राजकीय व्यक्तींना कर्ज मिळवून देण्यासाठी पाऊल उचलल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. या देशात राजकारणाशी संबंधित बहुतांश लोक आहेत. ज्यांना नियमित वेतन दिले जाते. पण, राजकारणाशी संबंधित (Politically-Exposed Persons) असल्यामुळे त्यांना बँकांकडून कर्ज दिले जात नव्हते किंवा त्यांना सहजरीत्या कर्ज दिले जात नव्हते. एवढेच कशाला त्यांना बँकेत खाते उघडणेही कधी कधी शक्य होत नव्हते. आता त्यांची ही अडचण दूर होणार आहे. यात राज्य आणि देशाचे प्रमुख, ज्येष्ठ राजकीय नेते, लष्करी अधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, न्यायिक अधिकारी, सरकारी मालकीच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींचा समावेश होतो.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.