Sunil Kamble News: फडणवीसांचा पोलिसांवर दबाव, आता कोर्टात जाणार

NCP: राष्ट्रवादी सुनील कांबळे यांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार
NCP Prashant Jagtap
NCP Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात आले.

ससून रुग्णालयामध्ये एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी आमदार कांबळे आले होते. त्यावेळी त्यांनी येथे ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी देखील आमदार कांबळे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर शुक्रवारी थेट पदाधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याने कांबळे यांच्या विरोधात सर्वच स्तरातून आवाज उठविला जात आहे. विविध संस्था संघटनांनी त्यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP Prashant Jagtap
Sunil Kamble Slap Police : पोलिसाला मारहाण करणे भाजप आमदारांना भोवले; सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल!

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता पेठ, पॅावर हाऊस चौकात आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. मारहाण करणारे आमदार कांबळे यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. जगताप म्हणाले, भाजप आमदार कांबळे यांनी केलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. भाजप सरकारच्या काळात नागरिक सोडा पण पोलीसही सुरक्षित नसल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कांबळे यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे.

यापुढील काळात कांबळे यांची मुजोरी अशीच सुरू राहिल्यास राज्यपालांनी सुनील कांबळे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी जगताप यांनी केली. हे कृत्य भाजपाच्या आमदाराने केल्यामुळ राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळे काल पुण्यात दहा ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहे. कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास सोमवारी मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल करून कांबळे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश पुणे पोलिसांना देण्याची मागणी केली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ही घटना पुण्यापुरती मर्यादित नसून या घटनेमुळे सबंध महाराष्ट्रातील पोलिसांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने त्यावर त्वरित योग्य ती पावले उचलणे आवश्यक असल्याचं जगताप म्हणाले.

(Edited By - Chaitanya Machale)

NCP Prashant Jagtap
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी पकडले आठ आरोपी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com