Mungantiwar letter to Karnataka Govt. : शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारा ; मुनगंटीवारांनी कर्नाटक सरकारला खडसावले

Karnatak Politics : कर्नाटकातील बागलकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपरिषदेने कडक बंदोबस्तात हटवला.
Mungantiwar letter to Karnataka Govt.
Mungantiwar letter to Karnataka Govt. Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कर्नाटकातील बागलकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपरिषदेने कडक बंदोबस्तात हटवला. पुतळा उभारण्यासाठी परवानगी न घेतल्याने तो हटवण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाने केला. तरीही त्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्रातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवरायांचा पुतळा पु्न्हा त्याच जागी बसवण्याचा आग्रह राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक सरकारला केली आहे. पुतळा हटवण्यासाठी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे ट्वीट

"कर्नाटकातील बागलकोटच्या चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकातल्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारने हटविला. त्याचा निषेध करीत सदर पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानपूर्वक स्थापन करण्याची, तसेच झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याची आणि या प्रकारास जबाबदार व्यक्तींना कडक शिक्षा करण्याची मागणी कालच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

Mungantiwar letter to Karnataka Govt.
Kolhapur NCP News : शरद पवारांची खेळी; 'मविआ'कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरणार..?

#छत्रपती_शिवाजी_महाराज हे संपूर्ण भारताला पूजनीय असून ते भारतीय स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिल श्रीमंत शहाजी राजेंच्या अमलाखालीच बागलकोटच नव्हे तर कर्नाटकचा बहुतांश भाग होता. आणि कर्नाटकच्या आजची राजधानी बंगळुरूची स्थापना आणि विकास शहाजी राजेंनी केला असल्याच्या ऐतिहासिक तथ्याची जाणीवही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने राखली पाहिजे." असेही मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवण्यात आल्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही भाजपचे सरकार असतानाच कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यावेळीही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला होता.अशातच बागलकोट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शिवरायांचा पुतळा अनधिकृत असल्याने सांगून काढला. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. या कारवाईला भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनीही मोठा विरोध केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com