पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) विरुद्ध शिवसेना बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सत्तासंघर्षात महाराष्ट्रातील राजकारण कुठल्या दिशेला जाणार, हे येत्या काही दिवसात समजणार आहे. सध्या मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकटे पडल्याचे चित्र आहे. (Eknath Shinde news updates)
सहा दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भगदाड पाडलं अन् एक-एक आमदार त्यांच्या गटात सामील होत आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे फक्त तीन मंत्री उरले आहेत, आदित्य ठाकरे, अनिल परब, सुभाष देसाई हे तीन मंत्री ठाकरेंकडे आहेत, देसाई आणि परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर दुसरे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आहेत. (Shivsena Political Crisis News)
दुसरीकडे एकनाथ शिदेंकडे ८ मंत्री आहेत.संदीपान भुमरे, उदय सामंत,दादा भुसे, गुलाबराव पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येड्रावकर, बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) यांचा यात समावेश आहे.
शिंदे हे (eknath shinde) आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात विलीन करतील, अशी चर्चा आहे. याबाबतची कायदेशीर लढाई आज सुप्रीम कोर्ट मध्ये सुरू होणार आहे. (Udhav Thackeray News in Marathi)
शिंदे गटाची आज दुपारी बारा वाजता बैठक आहे. अकरा वाजता उदय सामंत ऑनलाइनच्या माध्यमातून माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे. या निकालानंतर शिंदे गट पुढील रणनीती ठरविणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 47 झाली आहे. यात शिवसेनेचे 38 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 8 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत.
1) एकनाथ शिंदे (मंत्री)
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई (मंत्री)
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे (मंत्री)
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील (मंत्री)
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे (मंत्री)
37) संजय राठोड
38) उदय सामंत (मंत्री)
1) बच्चू कडू (मंत्री)
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर (मंत्री)
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) गीता जैन
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.