राज्यसभा निवडणूक : फडणवीसांचे मतदान कसे घ्यायचे? आयोगाला लिहिले पत्र

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) अनेक नियमांचा किस
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha election 2022) निमित्ताने अनेक नियमांचा किस पाडला जात आहे. तुरुंगात असलेले आमदार मतदान करू शकतात का, अपक्ष आमदारांना व्हीप लागू होतो का, व्हिप न पाळणाऱ्यांचे पद राहते का, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. आता यात नवीन शक्यतेची भर पडली आहे. कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे, असा सवाल आता निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यांनी याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. (Returning Officer of Rajya Sabha election writes election commission about voting of corona affected MLAs)

राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी मतदान होत आहे. त्या आधी विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोरोनाबाधित झाले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुढील चार दिवसांत आणखी काही आमदारांना लागण झालीच तर काय करायचे, असा प्रश्न आयोगापुढे आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.

Dhananjay Mahadik
राज्यसभा निवडणुकीची धामधूम : कोरोना रुग्णांची वाढ, मतदानाचं काय होणार?

फडवणीस हे कोरोनाबाधित झाल्याने भाजपच्याही नेत्यांची अडचण झाली आहे. कारण या निवडणुकीची सारी सूत्रे फडणवीस यांच्या हाती आहेत. त्यांच्याच शब्दावर अनेक मते फिरणार आहेत. त्यांनी अनेक अपक्ष आमदारांशी संपर्क साधल्याची चर्चा असली तरी त्यांच्या फिरण्यावर बंधने आल्याने भाजपसाठी आता इतर नेते धावपळ करत आहेत.

भाजपने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे. त्यांनी भाजपच्या तयारीचा आढावा घेतला. धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी काय मोर्चेबांधणी करायची याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वैष्णव यांच्या बैठकीला फडणवीस हजर राहू शकले नव्हते.

दुसरीकडे महाविकास आघाडी आणि भाजप यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी बैठकांचा तडाखा सुरू आहे. याबाबत बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की निवडणूक म्हणजे बैठका होणारच. आमच्या सगळ्या सदस्यांना प्रेफे्न्शियल वोटिंग कशी करावी हे सांगावं लागणार आहे. हा महत्त्वाचा विषय आहे. आमच्याजवळ विजयासाठीचे आकडे आहेत. विकास आघाडीकडे पुरेसे मतदार असल्याने आमचे चारही उमेदवार विजय होतील. मात्र मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी लागते. चुकीच काही चालत नाही. त्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. ती आम्ही करत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com