जालंधर : पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेल्या भगवंत मान (bhagwant man)यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला. एका निर्णयात १२२ माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढली.
भगवंत मान यांनी माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या बडे नेते देखील आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे त्यांची सुरक्षा कायम राहणार आहे.
भगवंत मान यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar)यांनी मान यांच्या निर्णयाचे स्वागत करुन हा निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांसाठीही घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत.
''पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेऊन माजी मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेबाबत विचार करावा,'' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ''राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत निर्णय घ्यावा,'' असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी याबाबत टि्वट करीत ही माहिती दिली आहे.
''माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा,'' असे टि्वट पवारांनी केले आहे. यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले आहे. कॅाग्रेस भुईसपाट झाली आहे. राज्यातील पोलिसांना त्यांचे काम करु दिले पाहिजे यासाठी असा निर्णय घेत असल्याचे भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
''राज्यात पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे. राज्यातील पोलीस ठाणे ओस पडले आहेत. काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा राज्यातील जनतेची सुरक्षा महत्त्वाची आहे,'' असे भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.