Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar News : आमदार रोहित पवारांचे फेसबुक पेज हॅक; ट्विट करून दिली माहिती

Ncp Mla Rohit Pawar Facebook Account Hack : रोहित पवारांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे...
Published on

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले. रोहित पवारांनी ट्विट करून ही माहिती दिली. रोहित पवारांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्या ठिकाणी प्रोफाईल फोटोला सिया राजपूत नाव दिले आहे.

Rohit Pawar
Maharashtra Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी नवरा-बायकोत कॉम्पिटिशन; रेसमध्ये तिसरा अधिकारीही, जोरदार लॉबिंग सुरू

आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटर अकाउंटवरून दिली. गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं…या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. काही दिवसांपासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू असल्याने त्यांनी ट्विटमधून संताप व्यक्त केला आहे. तसेच फेसबुक पेज रिकव्हरीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहित पवारांचे ट्विटरसह फेसबुकवर लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. फेसबुक पेजवर त्यांचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Edited by Sachin Fulpagare

Rohit Pawar
Ajit Pawar : " आता कितीही किंमत मोजावी लागली तरी..."; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com