Ajit Pawar : " आता कितीही किंमत मोजावी लागली तरी..."; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

NCP Ajit Pawar Group Meeting : मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपनंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेने (शिंदे गट) देखील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. बैठका, मेळावे, शिबिरे, भेटीगाठी यांचा धडाका लावला असून निवडणुकांच्या दृष्टीने आपली ताकद वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्वांना तयारीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक आपण महायुतीसोबत एकत्रितपणे आणि घड्याळ या चिन्हावरच लढणार असल्याबाबतही भूमिका स्पष्ट केली.

Ajit Pawar
Amravati : आमदार बळवंत वानखडेंच्या वाहनाची धडक; शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जखमी

अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करत आपण आता भूमिका बदलणार नसून आपल्याला कुणालाही फसवायचे नसल्याचेही सांगितले. ते म्हणाले, भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो असेही ते म्हणाले.

याचवेळी त्यांनी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक काम करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. या विचारधारेला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अजिबात सोडायचे नाही असा निर्धारही बोलून दाखवला. याचवेळी त्यांनी आपल्याला कुणावर टीका करायची नाही पण कोणी आपल्या नेत्यांवर बोललं तर जशास तसं उत्तर द्या असेही आदेश कार्यकर्त्यांना दिले.(NCP)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही (Sharad Pawar) निशाणा साधला. ते म्हणाले, प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमानाप्रमाणे नवी पिढी पुढे येत असते, त्यांना मार्गदर्शन करावे लागते. मात्र, काही जण ऐकायला तयार नव्हते. तसेच कोण कोणाला ओवळताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. पण आपण आता खूप पुढे आलो आहोत. त्यामुळे आपल्याला गद्दारी, मॅचफिक्सिंग करायची नसल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : भाजपचं सगळं ठरलं, 'असा' आहे विजयाचा मेगा प्लॅन?; तयारीवर फिरवणार शेवटचा हात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com