मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी पुढे याल तर खबरदार; रामदास आठवलेंचा इशारा

पोलिसांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
Ramdas Athavale, Raj Thackeray
Ramdas Athavale, Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मशिदींवरील भोंगे कोणी जबरदस्तीने उतरवण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे (Constitution) राज्य असून इथे कुणाची मनमानी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिला.

Ramdas Athavale, Raj Thackeray
दोन इंच जास्त उंचीच्या सायकलमुळे भिडेगुरुजी धोतर अडकून पडले

ईदमुळे ३ मे रोजी भोंग्यांना हात लावणार नाही, परंतु ४ मे रोजी ते काढणार, असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. राज यांची ही भूमिका संविधानविरोधी आहे. रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करेल. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. मुस्लिम समाजातील व्यक्तींनीही संयम पाळावा. आक्रमक उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कोणीही घेऊ नये. समाजात शांतता-बंधुता-सौहार्द टिकवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला आहे, असेही आठवले म्हणाले.

Ramdas Athavale, Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सुपारीची किंमत सांगा : आशिष शेलारांचे अजितदादांना आव्हान

रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेशचा मेळावा येत्या २८ मे रोजी चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा. मुंबईत रिपब्लिकन पक्ष कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा देण्यासाठी मेळाव्यात पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडवा, असे आठवले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com