RSS News: मतभेद मिटले: महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपसोबत RSSने बाह्या सरसावल्या!

Maharashtra Politics RSS initiative to win Maharashtra: झारखंडची सत्ता मिळविण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. आरएसएसने जुलैत रांची येथे राष्ट्रीय बैठक आयोजित केली होती. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
RSS News
RSS NewsSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे, यासाठी भाजपच्या कोअर समितीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने (आरएसएस) आता निवडुकीच्या रिंगणात उतरला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र, हरयाणात भाजपला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. झारखंडमध्येही १४ पैकी ८ जागांवरच विजय मिळविता आला, तर आदिवासीबहुल असलेल्या राज्यातील लोकसभेच्या पाचही जागांवर भाजपचा पराभव झाला. सध्या महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपची सत्ता आहे. येथील सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपसोबतच आता आरएसएसने कंबर कसली आहे.

झारखंड जिंकण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. जुलैत रांची येथे आरएसएसने राष्ट्रीय बैठक घेतली होती. बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेत्यांसह अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही उपस्थित होते.सत्ता मिळविण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. "राजकारणात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याऐवजी भाजप स्वत:च्या बळावर राजकारण करण्यास सक्षम आहे," असे नड्डा म्हटलं आहेत.नड्डांच्या विधानावर आएसएसने मौन बाळगले.

भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर अरुण कुमार हे समन्वयाचे काम पाहत आहेत; पण विधानसभा निवडणुकीसाठी ते या राज्यांवरही विशेष लक्ष देणार आहेत. आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये हे महाराष्ट्रात भाजपशी समन्वय साधत आहेत. संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार हरयाणात समन्वयाने काम करत आहेत. ते झारखंड आणि जम्मू-काश्मीरचेही काम पाहत आहेत.

RSS News
Sharad Pawar: VIDEO मविआ CM पदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी थेटच सांगितलं, म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण...

महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीश्वरांनी सोपवली आहे. भाजपला किती जागा मागायच्या आणि अन्य पक्षांना किती जागा द्यायच्या याचा निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपने फडणवीसांवर सोपवली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com