Congress News :... तर विधानसभा निवडणूक लावण्याचे धाडस का करत नाही? राज्य सरकारला सचिन सावंतांचा सवाल

Political News : राज्य सरकार आता बहिणींना लाडकी म्हणत आहेत, मात्र त्यांनीच महागाईमुळे त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Devendra Fadvanis, Eknath Shinde, Ajit Pawar, Sachin Sawant
Devendra Fadvanis, Eknath Shinde, Ajit Pawar, Sachin Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना सुरु केली. त्यानंतरही महायुती सरकारला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लावण्याचे धाडस का करता आले नाही. आता बहिणींना लाडकी म्हणत आहेत, मात्र त्यांनीच महागाईमुळे त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

राज्यातील महायुतीचे हे सरकार बिल्डरधार्जिणे झाले असून गिरगावात तर मंदिर बिल्डरसाठी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई पालिकेकडून सव्वा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याची यादी का दिली जात‌ नाही, असा आरोपही काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांनी करीत सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे. (Congress News)

राज्यातील महायुतीची सत्ता येत्या काळात जाणार आहे. त्यामुळे मुंबई पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. नाशिकमध्ये, विशाळगडमध्ये तशाच घटना घडत आहेत. साम, दाम, दंड भेद सर्व पर्याय अवलंबले जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून (Bjp) फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्धा ट्रिलियन डॉलरची झाली आहे. पण 2015 मध्ये फडणवीस अमेरिका दौऱ्यात म्हणाले होते. 2025 साली महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करु मग आता अर्धा ट्रिलियन झाले तर हे अपयश कोणाचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Devendra Fadvanis, Eknath Shinde, Ajit Pawar, Sachin Sawant
Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

त्यामुळे पीएम नरेंद्र मोदींचं हे अपयश आहे का ? आपला विकास दर 7.85 टक्के होता. ते तुम्ही गाठू शकत नाही. महाराष्ट्र मागे गेला त्याचे पाप तुमचेच ‌आहे. फडणवीस आणि फसवणीस हा एकच शब्द आहे. पुण्यात गेल्या काही दिवसात बोलले. 2036 साली आपण 2 ट्रिलियन करु, हा फेक नरेटिव्ह सुरु आहे. लोकांना फसवलं जात असल्याची टीका यावेळी सावंत यांनी केली.

Devendra Fadvanis, Eknath Shinde, Ajit Pawar, Sachin Sawant
Bjp News : भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? शनिवारच्या बैठकीत होणार चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com