Supriya Sule News : ''...त्यांच्या कष्टाला सलाम!''; खासदार सुप्रिया सुळेंचा 'तो' सेल्फी अन् पोस्ट चर्चेत...

Supriya Sule Selfi and Post Viral : ...यासाठी ते भल्या पहाटेपासून काम करीत असतात.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे सातत्यानं आपल्या मतदारसंघाचा दौरा करत नागरिकांच्या भेटीगाठी,समस्या, विकासकामं, ध्येयधोरणं याबाबत नेहमीच जागरुक असतात. त्याचवेळी मतदारसंघातील प्रश्नांसह राजकीय परिस्थितीवरही त्या संसंदेतही आक्रमकपणे आवाज उठवत असतात. याचवेळी त्या सोशल मीडियावरही अनेेक घडामोडींची माहिती देत असतात. आता खासदार सुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) या समाजोपयोगी कामाबरोबरच आरोग्य, व्यायाम यांच्याबाबतीतही तितक्याच आग्रही असतात. त्या नित्यनेमाने पहाटेच फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात. बुधवारी सकाळी मुंबईमध्ये त्या अशाच नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या असता त्यांना एक दूधवाला निदर्शनास पडला. यावेळी त्यांनी विचारपूस केली. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. यानंतर विशेष म्हणजे सुळे यांना दुधवाल्यासोबत सेल्फी काढला.

Supriya Sule
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

खासदार सुप्रिया सुळे यांनी 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत दुधविक्रेत्यासोबत सकाळी घेतलेला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो दूध विक्रेत्यासोबतचा त्यांचा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रत्येकाच्या घरात दूध वेळेवर पोहचावे व त्यांना त्यांचा 'पहिला चहा' वेळेवर मिळावा, त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न असावी यासाठी ते भल्या पहाटेपासून काम करीत असतात.त्यांच्या कष्टाला सलाम असे कौतुकोद्गार सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये दुधविक्रेत्यांविषयी काढले आहेत. या फोटोला काही तासांतच हजारावर लाईक्स मिळाले. खूप जणांनी सुळे यांची पोस्ट शेअर देखील केली आहे.

Supriya Sule
Ambadas Danve News : सुहास कांदेंच्या मतदारसंघात अंबादास दानवेंचे सरकारविरोधी षटकार!

काय आहे पोस्ट?

बारामती मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा...! अशा शीर्षकाखाली दुधविक्रेत्यांसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे.

यावेळी त्यांनी'सकाळी पाच वाजल्यापासून हे कष्ट करतात. प्रत्येकाच्या घरात दूध वेळेवर पोहचावे व त्यांना त्यांचा 'पहिला चहा' वेळेवर मिळावा, त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न असावी यासाठी ते भल्या पहाटेपासून काम करीत असतात. त्यांच्या कष्टाला माझा सलाम!' असा मजकूर लिहिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com