Devendra Fadnavis On Congress : भिडे हे आमच्यासाठी 'गुरूजी'च ! काँग्रेसचा विरोध मोडीत काढत फडणवीस कडाडले

Maharashtra Politics : '' आम्हाला ते गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? ''
Devendra Fadnavis- Samnbhaji Bhide
Devendra Fadnavis- Samnbhaji Bhide Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गा्ंधींविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभर आंदोलनं, निषेध सुरू असतानाच पावसाळी अधिवेशनातही त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. भिडेंविरोधातला संघर्ष दिवसागणिक धारदार होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहातच संभाजी भिडे यांचा 'गुरूजी' असा उल्लेख आणि त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधकांचा हल्ला परतवून लावतानाच फडणवीसांनीही भिडे हे आम्हाला गुरूजीच वाटतात, त्यात तुम्हाला काय अडचण..? असा प्रतिसवाल केला.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा संभाजी भिडे यांचा विधानाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सत्ताधारी- विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी भिडे यांचा मुद्दा बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. यावर फडणवीसांनी सभागृहात निवेदन दिले. यावेळी भिडेंनी महापुरुषांचा अवमान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

त्यानुसारच वीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'शिदोरी' या नियतकालिकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis- Samnbhaji Bhide
Devendra Fadnavis News : संभाजी भिडेंवरुन विरोधकांचा विधानसभेत गदारोळ; फडणवीसांनी ठणकावून सांगितले

अमरावती राजापूर पोलीस ठाण्यात 29 जुलै रोजी संभाजी भिडे गुरुजी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला ते गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? त्यांचं नाव संभाजी भिडे(Sambhaji Bhide) गुरुजी आहे. भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून नोटीस बजावली आहे. त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होणार असल्याचेही फडणवीसांनी सभागृहात सांगितले.

अमरावतीतील व्हिडीओ नाही. जे माध्यमात फिरत आहे. ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आहेत. त्याचं सँपल घेऊन चौकशी केली जाणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार केली आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis- Samnbhaji Bhide
Jalgaon Commissioner News: आयुक्तांविरोधाचा 'अविश्वास' मागे, पण महाजन-पाटलांचे 'टेन्शन' वाढलेलेच ! काय आहे कारण ?

महापुरुषावर कुणीही अशाप्रकारे वक्तव्य केलं तर...

कोणत्याही राष्ट्रीय पुरुषाच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात हे कार्य चांगलं आहे.

पण तरीही त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं विधान करायचा अधिकार दिला नाही. त्यांनाच काय कुणालाही नाही. त्यामुळे महापुरुषावर कुणीही अशाप्रकारे वक्तव्य केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis) महापुरूषांविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना दिला आहे.

सावरकरांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या 'शिदोरी'वरही गुन्हा ?

काँग्रेस(Congress) चे मुखपत्र असलेले 'शिदोरी'देखील अडचणीत आले आहे. शिदोरीतून वीर सावकरांवर आक्षेपार्ह लिखाण केले गेले होते. त्यात वीर सावरकर माफीवीर होते, ते समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. असं लिहिलं जात आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देतानाच फडणवीसांनी सावरकरांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या काँग्रेसच्या 'शिदोरी'वरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com