Chhatrapati SambhajiRaje News: संभाजीराजेंची मोठी घोषणा; स्वराज्य संघटना 2024 ची लोकसभा, विधानसभा लढणार

Swarajya Sanghatna : सत्तार आणि सावंत हे दोन्ही मंत्री मग्रूर असून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje Sarkarnama

Navi Mumbai News : साडेतीनशे वर्षानंतर देखील शिवाजी महाराजांच्या वंशजांवर लोकं तितकेच प्रेम करतात. राजकीय गुण माझ्यात नाही. पण नशिबाने मला फसवलं म्हणून माझ्यात चीड निर्माण झाली. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न तर करु. याचवेळी त्यांनी 2024 च्या सर्व निवडणुका स्वराज्य संघटना लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा रविवारी(दि.२६) रोजी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झाली. मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत ही जाहीर सभा घेण्यात आली. या सभेद्वारे संभाजीराजे यांनी २०२४ च्या निवडणुका लढण्याचे संकेतही दिले.

Chhatrapati Sambhajiraje
Pimpri-Chinchwad : पिंपरीत राजकारण तापलं; भाजप- राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) म्हणाले, स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आली आहे. स्वराज्य म्हणजे तुमचं राज्य. 2024 मध्ये तुमच्या हातात सगळं आहे. तुम्हांला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी पाहिजे हे तुम्हाला निवडायचंय. यावेळी त्यांनी तुम्ही ताकद द्या, 2024 मध्ये बदल दिसेल असे आगामी निवडणुकांचे रणशिंगही फुंकले.

दोन्ही मंत्री मग्रूर...

तसेच संभाजीराजे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संभाजीराजे म्हणाले, दोन्ही मंत्री मग्रूर असून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची दूरवस्था आहे. 6 फेब्रुवारी रोजी धाराशिवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. एक महिना झाला, पण काहीच सुधारणा झाली नाही. लगेच दुरुस्ती करा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा असंही संभाजीराजे म्हणाले.

Chhatrapati Sambhajiraje
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना कळली ग्रामीण महाराष्ट्राची नस; शेतकऱ्यांच्या प्रश्नाना हात घालत फुंकले रणशिंग

पांढरा रंग लावला म्हणून...

संभाजीराजे यांनी नवी मुंबईतील सभेत गणेश नाईक यांच्यावरही निशाणा साधला. संभाजीराजे म्हणाले, जसे अमेरिकेत व्हाईट हाऊस तसे इथे पण व्हाईट हाऊस आहे. आम्ही सांगू तो आमदार, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर. परंतु आम्हालाही हुकूमशाही चालत नाही. एकच व्हाईट हाऊस आहे, ते अमेरिकेत. दुसरं इथे आणायची गरज नाही. पांढरा रंग लावला म्हणून व्हाईट हाऊस होत नाही. लोक ठरवतील तेव्हा ते महत्त्वाचं अशा शब्दात त्यांनी गणेश नाईकांवर हल्लाबोल केला.

...आता विशालगडावरचं अतिक्रमण हटवा

परवा माहिममध्ये एक वास्तू तोडून टाकली, त्याचं कौतुक आहे. अफझल खानची कबर हटवली त्याचंही कौतुक आहे. परंतु ज्या किल्ल्याने संरक्षण दिलं, वाचवलं त्या विशालगडाची दूरवस्था झाली आहे, तिथलं अतिक्रमण हटवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com