Sambahjiraje : शाहू महाराज-बाबासाहेब आंबेडकरांचे वारस एकत्र येणार? विधानसभेपूर्वी संभाजीराजेंचे मोठे संकेत

Rajratna Ambedkar : राजकारणात शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे न्यावे लागतात, म्हणून मी राजकारणात आहे. मागे राहून चालणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
Sambhajiraje Chhatrapati, Rajratna Ambedkar
Sambhajiraje Chhatrapati, Rajratna AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकरांना राजकारणात येण्याची साद घातली आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना उद्देशून हा तुमचा नेता आहे, असे म्हटले होते. आता मीही थोड्याफार प्रमाणात तसे बोलू शकतो, म्हणत राजरत्न आंबेडकरांना राज्यभर फिरवण्याची जबाबदारी माझी आहे, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले. Rajratna Ambedkar

त्यास तुम्ही म्हणाल तेथे नक्की येईल, असा प्रतिसाद राजरत्न यांनी दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शाहू महाराजांचे वारस संभाजीराजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वारस राजरत्न आंबेडकर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवात संभाजीराजे बोलत होते. त्यावेळी त्यांनी डॉ. राजरत्न आंबेडकर Rajratna Ambedkar यांना राजकारणात सक्रिय होण्याचे जाहीरपणे आवाहन केले. संभाजीराजे म्हणाले, या कार्यक्रमाला फक्त शाहू महाराजांचे पणतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू म्हणून आलेलो नाही. त्यात माझाही स्वार्थ आहे. राजरत्न हे राजकीय व्यक्ती नाहीत ही त्यांची अडचण आहे. त्यांना राजकारण आवडत नाही. मलाही आवडत नाही, पण पर्याय नाही.

राजकारणात शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे न्यावे लागतात, म्हणून मी राजकारणात आहे. मागे राहून चालणार नाही. तुम्हाला आवडेल का नाही राजकारण मला माहिती नाही. मात्र राजरत्नजी, तुमच्यासाठी बाबासांहेबांनी घटना लिहिलेली आहे. तुम्हाला 'स्वराज्या'त या असे म्हणणार नाही. राजकारणात यायचे की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी माझी आहे, असे सूचक विधान संभाजीराजेंनी Sambhajiraje केले.

Sambhajiraje Chhatrapati, Rajratna Ambedkar
Ravikant Tupkar Vs Raju Shetti : 'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर रविकांत तुपकरांना धक्का! म्हणाले, राजू शेट्टींनी...

संभाजीराजेंच्या आवाहनास प्रतिसाद देताना राजरत्न यांनी इतिहासाचे दाखला दिला. ते म्हणाले, एक काळ होता छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचे नेतृत्व जगासमोर आणले. त्यावेळी बाबासाहेबांनी, ही तुमची लेकरे नाहीत का, असा सवाल केला होता. त्यावर शाहू महाराज कन्या आजारी असतानाही मांडगावच्या परिषदेला आले होते. तेथून शाहू महाराजांनी बाबासाहेब भारताचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले होते.

आज पुन्हा 100 वर्षानंतर त्याच घराण्यातून संभाजीराजे छत्रपती पुन्हा त्याच आंबेडकर घराण्यातील या राजरत्नला संपूर्ण भारतासमोर आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला वचन देतो ज्या ठिकाणी, ज्या वेळी तुम्ही बोलावाल तेथे हा राजरत्न नक्की हजर असेल, असा शब्दही राजरत्न आंबेडकर यांनी दिला.

राजरत्न आंबेडकरांची भूमिका काय?

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधु आनंदराव आंबेडकर यांचे पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभेचे सचिव म्हणून काम पाहतात. त्यांनी राजकारणात येण्याचे भूमिका स्पष्ट केलेली आहे. काका, प्रकाश आंबेडकरांचे Prakash Ambedkar राजकारण अपेक्षितपणे पुढे जाऊ शकलेले नाही. त्यातच 'रिंपाइं' पक्षात मोठा पोकळी आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मूळ 'रिपाइं' घेऊन राजकारणात येत असल्याचे राजरत्न यांनी स्पष्ट केले आहे.

Sambhajiraje Chhatrapati, Rajratna Ambedkar
BJP Politics : काँग्रेसमधून आलेल्या आमदारावरून भाजपमध्ये घमासान; मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com