Ravikant Tupkar Vs Raju Shetti : 'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर रविकांत तुपकरांना धक्का! म्हणाले, राजू शेट्टींनी...

Swabhimani Shetkari Sanghtana : राज्यात संघटना वाढीसाठी 22 वर्षे काम केले. लाठ्या-काठ्या खाल्या. वेळप्रसंगी तुरुंगात गेलो, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : चळवळीत 22 वर्षे काम करणाऱ्या, संघटना वाढवण्यासाठी लाठ्या-काठ्या खाणाऱ्या, प्रसंगी तुरुगांत जाणाऱ्या एका कार्यकर्तावर हकालपट्टीची कारवाई करण्यात येते, ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक आहे, अशी उद्विग्नता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांच्यावर आरोप केल्यानंतर रविकांत तुपकरांबाबत निर्णय घेण्यासाठी संघटनेकडून समिती नेमली होती. या समितीकडून तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून थेट हकालपट्टी करण्यात आली. या निर्णयामुळे तुपकरांना धक्का बसला आहे.

तुपकर Ravikant Tupkar म्हणाले, ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक आहे. 22 वर्षे चळवळीसाठी काम केले. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. अनेकवेळा तुरुंगात गेलो. संघटना घराघरात पोचवली. आता इतके वर्षे काम केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ येईल, असे कधी वाटले. एवढे वर्षे महाराष्ट्रात संघटना वाढवल्याचे फळ राजू शेट्टी यांनी मला दिले, अशी भावनाही तुपकरांनी व्यक्त केली.

दरम्यान, तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दिग्गज नेत्यांना टफ देत तब्बल 2 लाख 49 हजार मते घेतली. त्यावेळी त्यांच्याशी संघटनेकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचेही सांगत येत्या 24 जुलै रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ravikant Tupkar
Hasan Mushrif : आता लाडकी म्हैस योजना आणावी लागेल; हसन मुश्रीफांचा टोला, नेमके काय म्हणाले?

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. त्यात माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रहार, संभाराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्षा त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांना तुपकरही मिळणार असल्याचे बोलले जाते. यावर रविकांत यांनी, 24 जुलै रोजी राज्यातील प्रमुख सहकाऱ्यांची पुण्यात बैठक बोलावलेली आहे. त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.

Ravikant Tupkar
Dr. Aniket Deshmukh : सांगोल्यात आमदारकीसाठी दोन भांवडांमध्ये रंगणार सामना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com