SambhajiRaje Chhatrapati: नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचा शोध संभाजीराजे घेणार; काय आहे प्रकरण

Sambhaji Raje to Investigate Shiv Smarak Inaugurated by Narendra Modi: येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही…असा सवाल करीत 'चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…'
Chhatrapati Shivaji Maharaj Memorial
Chhatrapati Shivaji Maharaj MemorialSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज संघटनेला काल (मंगळवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाची मान्यता मिळाली आहे. 'महाराष्ट्र स्वराज पक्ष' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. संघटनेला नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर संभाजीराजे आता सक्रीय झाले आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) रखडलेल्या कामाबाबत संभाजीराजेंनी आवाज उठवला आहे. फेसबूक पोस्ट करीत त्यांनी कार्यकर्ते, शिवप्रेमींना 'चलो मुंबई'ची हाक दिली आहे.

मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली.

२४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप-शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial
Thackeray group: लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत, आता विधानसभेच्या तोंडावर गायींना मंचावर आणलं!

येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही…असा सवाल करीत 'चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…' असे आवाहन त्यांनी केले आहे.

येत्या रविवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे 'महाराष्ट्र स्वराज पक्ष'कडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ मध्ये ‘शिवस्मारका’साठी जलपूजन केले होते. परंतु अजून या कामाला सुरुवात झाली नाही.

संभाजीराजे यांना “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या स्वराज संघटनेला आता अधिकृतपणे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने (Maharashtra Swarajya Party)मान्यता मिळाली आहे. एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com