Maratha Reservation : संभाजीराजे हे फडणवीस सरकारला मॅनेज झाले होते?

Sambhajiraje यांच्या उपोषणाला बसण्याच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
Sambhajiraje
Sambhajirajesarkarnama

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न राज्याच्या राजकारणात पुन्हा घोंघावू लागला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी या प्रश्नी पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याने राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे. दुसरीकडे संभाजीराजे यांनीही या उपोषणाची वेळ का आली, याचे सविस्तर स्पष्टीकरण देऊन आपली बाजू मांडण्याची प्रयत्न केला आहे.

ही बाजू मांडताना त्यांनी मुंबईत 9 ऑगस्ट 2017 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा मुद्दा मांडला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मोर्चाने परत न जाण्याची भूमिका तेव्हा घेतली होती. त्या वेळी संभाजीराजे यांनी व्यासपीठार जाऊन मोर्चेकऱ्यांची समजूत घातली आणि मोर्चा तिथे विसर्जित झाला. त्या वेळी संभाजीराजे यांनी फडणवीस सरकारला मोठ्या संकटातून वाचविले, अशी चर्चा सुरू झाली. एवढेच नाही तर संभाजीराजे मॅनेज झाले, असेही बोलले जाऊ लागले. या साऱ्या बाबींवर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात ... ``९ ऑगस्ट २०१७ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे मराठा क्रांती मूक महामोर्चाला हिंसक वळण लागण्याची शक्यता उद्भवली होती. यामुळे जगभरातून नावाजलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांना गालबोट लागले असते. मराठा समाजाची नाहक बदनामी तर झालीच असती शिवाय समाजाबरोबरच राज्याचेही तितकेच नुकसान झाले असते. इतके होऊनही समाजाच्या हाती काहीच न लागता, तरूणांचे भवितव्यही अधांतरीच राहिले असते. हे सर्व रोखणे गरजेचे होते. मात्र आपले राजकीय भवितव्य धोक्यात घालून मंचावर यायला कुणीच तयार होत नव्हते. यावेळी शासनाकडून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन घेऊन व मराठा समाजासाठी शासकीय योजना सुरू करण्याचे वचन घेऊन मी आझाद मैदानावरील मंचावर आलो. मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावरून कुणालाच बोलण्याची अनुमती नव्हती, त्यामुळे बोलण्यापूर्वी मी उपस्थित समाजबांधवांची तशी अनुमती घेतली व समाजाच्या उग्रतेला शांत केले. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मी पुढचा मागचा कोणताही विचार न करता मंचावर गेलो. संतप्त असलेला मराठा समाज माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन शांतपणे परत गेला. मोर्चाला कोणतेही गालबोट लागले नाही. मात्र अनेकांनी मी मोर्चा मॅनेज केला, तत्कालीन सरकारला मॅनेज झालो, अशा खालच्या स्तरावर जावून टीका केल्या, मला याची पूर्वकल्पना होतीच. मात्र मी केवळ समाजाने माझ्या शब्दांवर दाखविलेला विश्वास डोळ्यांसमोर ठेवला. पुढे तत्कालीन सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले. समाजाच्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी देखील सुरू केली.

Sambhajiraje
Russia Ukraine War: जगातला सर्वात मोठा देश असलेल्या रशियाला का हवा आहे युक्रेन?

संभाजीराजे लिहितात.. आज परत एकदा मराठा समाजाला त्याच मागण्यांसाठी झगडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाला बसणारी सामाजिक वर शैक्षणिक क्षेत्रातील अन्यायाची झळ कमी व्हावी, याकरिता समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता आम्ही आंदोलन केले. त्यानंतर विद्यमान सरकारने त्या मागण्या मान्य देखील केल्या, मात्र आज आठ महिने उलटले तरी त्या मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. समाजाची परिस्थिती "जैसे थे" आहे. मराठा तरुण अन्यायाच्या गर्तेत अडकला आहे. अशावेळी समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी नजरेआड करू शकत नाही. म्हणूनच समाजाला वेठीस न धरता, ही माझी जबाबदारी समजून मी स्वतः समाजाच्या या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्याच आझाद मैदानावर दि. २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com