Sameer Wankhede : समीर वानखेडेंसंदर्भात मोठी बातमी; 'या' गुन्ह्याची नोंद, वानखेडेंना क्रूझ ड्रग्ज प्रकरण भोवणार?

Aryan Khan Cruz Drug case : संभाव्य अटकेविरोधात वानखेडेंची मुंबई हायकोर्टात धाव
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News :

नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे झोनल संचालक समीर वानखेडे सर्वांना परिचित आहेत. त्यांनी २०२१ मध्ये एका क्रूझवर ड्रग्जची पार्टी सुरू असल्याचा दावा करत कारवाई केली होती. आणि या प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडत गेल्या, पण एक मोठा ट्विस्ट आला आहे.

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या संदर्भात आता एक मोठी बातमी आहे. ईडीने (ED) समीर वानखेडेंविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर ईडीने NCB च्या तीन अधिकाऱ्यांना समन्सदेखील बजावले आहे. त्यामुळे लवकरच या तीन अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल.

Sameer Wankhede
Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; घेतला 'हा' मोठा निर्णय

3 ऑक्टोबर 2021 रोजी तत्कालीन नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईलगत एका क्रूझवर (Drug Party) छापा टाकत एक ड्रग्ज पार्टी उधळून लावली होती. यात आर्यन खानला अटक केली होती. आर्यन हा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाची देशात चर्चा होती.

आर्यनला अटक झाल्यानंतर बॉलिवूड कसा ड्रग्जच्या विळख्यात आहे, याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. तसेच आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्या संदर्भातील अनेक सुरस कथांची चर्चा होत होती. अखेर 28 ऑक्टोबरला आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मंजूर झाला आणि 30 ऑक्टोबर 2021 रोजी तो तुरुंगातून बाहेर आला. तब्बल 22 दिवस आर्यन तुरुंगात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयने आणि ईडीनेही केला. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनने 22 तुरुंगवास भोगल्यानंतर कालांतराने त्याला क्लीन चिटदेखील देण्यात आली.

या क्रूज ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याचा साथीदार सॅम डिसूजा यांनी आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कुटुंबाकडून 18 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. शिवाय त्यातील 50 लाख रुपये घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच हे पैसे नंतर परत केल्याचेही FIR मध्ये नमूद केले आहे.

अखेर या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आता हायकोर्ट वानखेडेंना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Sameer Wankhede
Abhishek Ghosalkar Case : मुंबई सुटलेल्या गोळीतून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com