Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Maliksarkarnama

गुड वर्क, डिअर फ्रेंड...! समीर वानखेडे मलिकांना असं का म्हणाले?

नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्विट टाकून खळबळ उडवून दिली आहे.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (८ नोव्हेंबर) सकाळी एक ट्विट टाकून खळबळ उडवून दिली आहे. मलिकांनी आता थेट अभिनेत्री क्रांती रेडकरच्या (Kranti Redkar) कुटुंबावर निशाणा साधत तिची बहीण ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा दावा केला. तसेच वानखेडे यांनी याचं उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले आहेत.

मलिकांच्या या ट्विटनंतर वानखेडे यांनी त्यावर खुलासा केला आहे. आपण त्यावेळी नोकरीतच नव्हतो, त्यामुळे या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल, पण मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालो, २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले, मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध, असा प्रतिप्रश्न करत समीर वानखेडे यांनी हात वर केले आहेत.

Sameer Wankhede, Nawab Malik
वानखेडेंच्या मेव्हणीवर ड्रग्ज प्रकरणात गुन्हा? मलिकांच्या ट्विटने खळबळ

तसेच वानखेडे यांनी मलिकांना खोचक टोलाही लगावला आहे. 'प्रिय मित्रा, चांगलं काम केलंस', असं म्हणत वानखेडे यांनी मलिकांवर टीका केली. ते म्हणाले, एका महिलेचे नाव उघड करून चांगलं काम केलंत. आम्ही प्रेस नोट प्रसिद्ध करताना महिलांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचं नाव कधीच उघड करत नाही, असं वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मलिकांनी सोमवारी सकाळी वानखेडे यांची मेव्हणी व क्रांतीची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्याविषयी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनाच एक सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का? पुणे न्यायालयात तिचं एक प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्ही याचं उत्तर द्यायलाच हवं, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

Sameer Wankhede, Nawab Malik
मलिकांनी गौप्यस्फोट केला अन् अस्लम शेख यांनीही दिली कबुली

दरम्यान नबाव मलिक यांनी क्रांती रेडकरच्या बहिणीवर असलेल्या आरोपांशी काही कागदपत्रेही जोडली आहेत, ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटले आहे की, पुण्याच्या न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यांचा समीर वानखेडे यांच्याशी काय संबंध आहे. पुढील सुनावणी मार्च 2022 मध्ये आहे का, याची उत्तरे समीर वानखेडे यांनी द्यायला हवीत. धक्कादायक म्हणजे, हॉटेल ललितमध्ये वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका, पार्ट्या होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com