मलिकांची मालमत्ता जप्त झाल्यानंतर वानखेडे दुसऱ्याच दिवशी माध्यमांसमोर आले अन्...

दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वानखेडे तिथे आले होते.
Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आठ मालमत्तांवर ईडीने (ED) बुधवारी जप्तीची कारवाई केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एनसीबी (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) गुरूवारी अनेक दिवसांनी माध्यमांसमोर आले. दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वानखेडे तिथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधताना वानखेडे यांनी आंबेडकरांच्या विचार तरूणाई आत्मसात करून कार्य करण्याचे आवाहन केले. आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत वानखेडे म्हणाले, सर्व तरूण आणि सर्वांना सांगू इच्छितो की, आंबेकरांना तुम्ही आपले आदर्श माना. त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यांचे शिक्षण, त्यांचे सिध्दांत हे सर्व युवकांनी पालन करावे. आंबेडकर कॉलेज किंवा सिध्दार्थ कॉलेजमध्ये आंबेडकरांनी मांडलेल्या सिध्दांतांवर एक व्याख्यान ठेवावे. त्यांच्या विचारांच्या माध्यमातून तरूणाईला प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असे वानखेडे म्हणाले.

Nawab Malik and Sameer Wankhede
समीर वानखेडेंसोबत काम केलेल्या अमित गवाटेंकडे केंद्राकडून 'एनसीबी'ची जबाबदारी

एवढे बोलल्यानंतर माध्यमांनी त्यांना नवाब मलिकांची मालमत्ता जप्त झाल्याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. पण नवाब मलिक हे नाव ऐकताच वानखेडे हे काहीही न बोलताना हात दाखवून तिथून निघून गेलो. तिथून थोडे पुढे गेल्यानंतर त्यांनी पत्रकारांकडे पाहत हात जोडले. यावेळी त्यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्तेही होते. त्यांच्यासोबतच त्यांनी आंबेडकरांना अभिवादन केले.

वानखेडेंच्या जागी अमित गवाटेंची नियुक्ती

एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालकपदी IRS अमित फक्कड गवाटे (Amit Gawate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याआधी समीर वानखेडे यांच्याकडे ही जबाबदारी होती. पण त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली. त्यामुळे 31 डिसेंबर 2021 नंतर त्यांना त्यांच्या मुळ विभागात पाठवण्यात आले. विशेष म्हणजे गवाटे यांनीही मुंबई एनसीबीत वानखेडे यांच्यासोबत काही काळ काम केले आहे.

Nawab Malik and Sameer Wankhede
संतोष पाटलांच्या आत्महत्येनंतर भाजपच्या अडचणी वाढल्या; कंत्राटदारांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणी अटक झाली होती. हे प्रकरण देशात चांगलेच गाजले. मलिकांनी वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे, षडयंत्र रचल्याचे आरोप केले होते. तसेच बारचा परवाना, मुस्लिम असल्याचा दावा, अनेक प्रकरणांमुळे पैसे उकळल्याचा दावा मलिकांनी केला होता. त्यामुळे मलिक विरूध्द वानखेडे असा वाद महाराष्ट्रात पेटला होता. त्यानंतर वानखेडे यांची एनसीबीतील मुदत वाढवून देण्यात आली नाही. तर ईडीने मलिकांना काही दिवसांपूर्वीच मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली. नुकत्याच त्यांच्या आठ मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com