Sameer Wankhede will be Arrested: मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. आता ८ जूनपर्यंत वानखेडेंना अटकेपासून पुन्हा संरक्षण दिले असून या प्रकरणाशी संबंधित कोणतेही पुरावे माध्यमांना शेअर करु नका, असे निर्देशही दिले आहेत. तसेच, सीबीआयने उत्तर दाखल केल्या नंतर पुढील सुनावणी होईल, असंही सांगितलं आहे.
न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तसेच, तसेच, २२ मे पर्यंत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याचीही मुदत दिली होती. या प्रकरणी आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा वानखेडेंना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
तसेच, 'सीबीआय'ला चौकशीला सहकार्य करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यानंतर शनिवारी (२० मे) पाच तास आणि रविवारी (२१ मे) पुन्हा तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना न्यायालयात सादर केलेल्या चॅट अगोदर का दाखवल्या नाहीत? 'सीबीआय'ने गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्या फेव्हरमधील चॅट वानखेडे यांनी कशा बाहेर काढल्या? जेव्हा समीर वानखडे यांना खाजगी व्यक्ती के.पी.गोसावी यांच्यासंदर्भात विचारले तर त्याचं उत्तर का देत नाहीत?
वानखेडे यांनी के.पी.गोसावी याच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड असूनही त्याला तपासात सहभागी का केलं? याचे उत्तर त्यांनी का दिलं नाही?, अशा अनेक प्रश्नाचे उत्तर समीर वानखडे यांनी दिलेले नाही. असा दावा सीबीआय कडून केला जात आहे.तर दुसरीकडे, खोटे पुरावे सादर करून सीबीआय तपासाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा वानखेडेंनी केला होता. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने वानखेडेंना पुन्हा एकदा दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. (Sameer wankhede news Update)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.