Sandip Deshpande On Koshyari : "त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही, काही परिणाम झाला..." ; देशपांडेंचा कोश्यारींना खोचक टोला...

Sandip Deshpande On Bhagatsingh Koshyari : मनसेने उडवली माजी राज्यपालांची खिल्ली..
Sandip Deshpande On Koshyari :
Sandip Deshpande On Koshyari :Sarkarnama

Sandip Deshpande On Bhagatsingh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज मुंबई दौऱ्यावरती आले आहेत. सर्वोच्च न्यायालायाने सत्तासंघर्षाचा निकाल दिल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. भगतसिंग कोश्यारी हे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते. महापुरूषांबद्दल त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून गच्छंती करण्यात आली होती. यानंतर आता ते मुंबईत आल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sandip Deshpande On Koshyari :
Sanjay Raut On Rahul Narwekar: राऊतांनी नार्वेकरांना ठणकावलं; म्हणाले,'' दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल तर...''

कोश्यारी मुंबईत दाखल होताच शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक झाले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाकडून भगतसिंग कोश्यारींचा विरोध केला जात आहे तर आता मनसेकडून कोश्यारींची खिल्ली उडवली जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोश्यारींवर खोचक टीका केली आहे. कोश्यारी मुंबईत येत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया असे विचार असता देशपांडे म्हणाले, "कोश्यारी साहेबांना काही फरक पडला असेल, न्यायालयाच्या निकालाचा असं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटत नाही," असा खोचक टोला देशपांडेंनी लगावला.

फडणवीस-कोश्यारी भेट?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणातही राज्यपाल यांची भूमिकेची सातत्याने चर्चा झाली. शिंदे-फडणवीस सरकारस्थापनेतील राज्यपालांचे वर्तवणूक बेकायदेशीर असल्याचे गंभीर ताशेर न्यायालयाने ओढले होते. या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी माजी राज्यपाल हे मुंबईत दाखल होतील, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Sandip Deshpande On Koshyari :
Devendra Fadnavis Meet Koshyari : फडणवीस-कोश्यारी भेट होणार? ; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच...

न्यायालयाचे ताशेरे काय ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ता. ११ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने एक निरीक्षण असे नोंदवले की, ''तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणी बोलवण्यासाठी कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राज्यपालांनी तत्कालीन उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या चाचणीचे आदेश दिले हे बेकायदेशीर होते, असे न्यायालयाने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com