Devendra Fadnavis Meet Koshyari : फडणवीस-कोश्यारी भेट होणार? ; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच...

Devendar Fadnavis Meet BhagatSingh Koshyari : भेटीमागे दडलंय काय़?
Devendra Fadnavis Meet Koshyari :
Devendra Fadnavis Meet Koshyari : Sarkarnama
Published on
Updated on

Devendar Fadnavis Meet BhagatSingh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भगतसिंग कोश्यारी हे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते. महापुरूषांबद्दल त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून गच्छंती करण्यात आली होती.

Devendra Fadnavis Meet Koshyari :
Karnataka Politics : पक्षांतर करत राहिलेले सिद्धरमय्या अन् पक्षाशी निष्ठावंत शिवकुमार; मुख्यमंत्रीपदासाठी दोघांची दावेदारी मजबूत का?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणातही राज्यपाल यांची भूमिकेची सातत्याने चर्चा झाली. शिंदे-फडणवीस सरकारस्थापनेतील राज्यपालांचे वर्तवणूक बेकायदेशीर असल्याचे गंभीर ताशेर न्यायालयाने ओढले होते. या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी माजी राज्यपाल हे मुंबईत दाखल होतील, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Devendra Fadnavis Meet Koshyari :
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाचा नवा अंक; ठाकरे गटाचं दबावतंत्र तर शिंदेंचीही कायदेशीर चाचपणी!

न्यायालयाचे ताशेरे काय ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ता. ११ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने एक निरीक्षण असे नोंदवले की, ''तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणी बोलवण्यासाठी कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राज्यपालांनी तत्कालीन उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या चाचणीचे आदेश दिले हे बेकायदेशीर होते, असे न्यायालयाने म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com