संजय कुटेंची गुगली... म्हणे मी सुरतला योगायोगाने गेलो होतो...

सुरतेत शिवसेना आमदार व मंत्र्यांबरोबर असलेल्या डॉ. संजय कुटे ( Dr. Sanjay Kute ) यांनी अनेक गौप्य स्फोट केले.
Dr. Sanjay Kute
Dr. Sanjay KuteSarkarnama

मुंबई - राज्यात मागील 15 दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला भाजपने खिंडार पाडले. शिवसेनेचे आमदार व मंत्री सुरतमध्ये गेले. तेथून गुवाहाटी मार्गे गोव्यात दाखल झाले. शिवसेनेच्या या गटाचे नेतृत्त्व करणारे एकनाथ शिंदे रातोरात मुख्यमंत्रीही झाले. मात्र या घटनाक्रमात शिवसेना आमदार व मंत्री सुरतमध्ये असताना ज्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यात एक होते माजी मंत्री डॉ. संजय कुटे. सुरतेत शिवसेना आमदार व मंत्र्यांबरोबर असलेल्या डॉ. संजय कुटे ( Dr. Sanjay Kute ) यांनी मी सुरतला योगायोगाने गेल्याचे सांगत राजकीय घटनाक्रमात आणखी एक गुगली टाकत अनेक गौप्य स्फोट केले. BJP News Update

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील हे मोठे सत्तांतर होते. या घटनेचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सूत्रधार होते. या घटनाक्रमात काही लोक नाराज झाले. यात भाजपचेही काही लोक नाराज झाले परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा त्याग मूर्ती असलेला नेता महाराष्ट्राला मिळाला हे आम्ही समतो, असे मत त्यांनी मांडले.

Dr. Sanjay Kute
Video: 'बचत गटाच्या महिलांची कोट्यावधींची फसवणूक!'; संजय कुटे

ते पुढे म्हणाले की, आम्ही हे सत्तेसाठी केले नाही. ज्या विचारावर आम्ही जगतो आहेत, त्या हिंदुत्त्वाच्या तत्वज्ञानाला कुठेतरी तडा जात होता. हिंदुत्त्वाचे विषय मागे पडत होते, म्हणून लोकांनी 2019मध्ये निवडून दिलेले शिवसेना, भाजपचे हिंदुत्त्ववादी सरकार कुठल्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावे आणि हिंदुत्त्वाचा विचार पुढे जावा त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठा त्याग त्यांनी केला, असे त्यांनी सांगितले.

या सत्तांतराचे विशेष हे होते की, मी, माझा मुलगा यांनाच सत्तातर पाहिजे. मात्र हिंदू ह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रमाणे विचार केला की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल, ते स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत, असे मत त्यांनी मांडले.

Dr. Sanjay Kute
निलंबित बारा आमदारांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल : संजय कुटे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. यावर त्यांनी सांगितले की, हे नैसर्गिक आहे. फडणवीस यांनी काय ठरविले हे त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्या वेळी निर्णय जाहीर केला त्यावेळी भाजपचे आमदार, नेते व कार्यकर्त्यांना धक्का बसला. पुढे दोन तासात काय झाले हेच लोकांना कळेना. त्यामुळे आमदार, नेते व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना आपल्या भावना कळविल्या. फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष होऊन 2024मधील निवडणुकीत मोठे यश मिळविण्याची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून पक्षाच्या सेवेसाठी स्वतःला तयार केले होते. परंतु आमदार, खासदार, कार्यकर्त्यांचा दबावामुळे वरिष्ठ नेत्यांनी दोन तासांत त्यांना दिलेल्या आदेशामुळे मनस्थिती बदलावी लागली.

डॉ. कुटे हे सुरतला शिवसेना आमदारांबरोबर होते. यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, मी सुरतला वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. मला सत्तानाट्यातील काहीही माहिती नव्हते. तिथे गेल्यावर मला वाटले इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझे शिवसेनेशी 20 वर्षांपासून असलेले संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. शिवसेनेचे आमदार व माझी नैसर्गिक मैत्री आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मला सर्व माहिती झाले. तो पर्यंत मला काहीही माहिती नव्हते. शिवसेना आमदारांच्या आग्रहास्तव मी त्यांच्या बरोबर थांबलो, असे त्यांनी सांगितले.

Dr. Sanjay Kute
मी संजय कुटे, शपथ घेतो की म्हणताच... 'जय गजानन' चा नामघोष!

मी भाजपमध्ये 2004साली आलो. तेव्हापासून मी भाजप व शिवसेना एकत्र पाहत आहोत. शिवसेना-भाजपच्या आमदारांत छान ट्युनिंग आहे. भविष्यातही तेच ट्युनिंग दिसणार त्यामुळे मंत्री म्हणून आग्रहास्तव त्यांनी थांबविले, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपही नेत्यांची पार्टी नाही. कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात कोणताही वाद नाही. विरोधीपक्षाच्या हातात काहीही राहिले नाही म्हणून ते अफवा पेरत आहेत. आमच्या पक्षाचा कार्यकर्ता संयमी, संघाच्या मुशीत तयार झालेला आहे. त्यामुळे एकदा निर्णय झाला की त्यावर अंमलबजावणी होते, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com