`मातोश्री`वरील बैठकीला दांडी? शिवसेना खासदार मंडलिकांचा मोठा खुलासा!

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये ४ खासदार अनुपस्थित
mp sanjay mandlik
mp sanjay mandliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडनंतर शिवसेनेमधील 40 आमदार फुटले आहेत. त्यामुळे आता खासदारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे का? या पार्श्वभूमीवर शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, मंडलिक यांनी स्वत: यासंदर्भात खुलासा केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच दिल्लीमधील बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये १४ खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या (BJP) उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. या बैठकीमध्ये सर्व खासदार विरुद्ध संजय राऊत (Sanjay Raut) असा सामना रंगला. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे.

mp sanjay mandlik
परवाच 'मी कट्टर उद्धव ठाकरे समर्थक', म्हणणारे, कृपाल तुमानेही नॉट रिचेबल...

या बैठकीनंतर राऊत हे माध्यमांशी संवाद न साधता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून केली होती. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काही खासदार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले आहे.

शिवसेनेला पुनवैभव प्राप्त करण्यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा जोमाने एकवटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदेशाने राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहावयास मिळणार असल्याचे मंडिलक यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांचा गुरवारी (ता. १४) सकाळी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत शहर व दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, बैठकीला 18 पैकी 4 खासदार गैरहजर होते. सगळ्या खासदारांनी भाजप उमेदवार आदिवासी असल्याने त्यांना मतदान करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे उद्या आपली भूमिका जाहिर करणार आहेत. कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही, असेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.

mp sanjay mandlik
कैसे छोड दू अकेला उनको, जिसे हराने सारी दुनिया एक हो चूकी है..!

एकनाथ शिंदे गटात कोण जाणार यावर चर्चा झाली नाही, असेही किर्तीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की द्रौपदी मुर्मु यांना मतदान केले तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होईल यावर काही चर्चा झाली का? त्यावर किर्तीकर यांनी सांगितले यावर कोणतीही चर्चा झाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com