Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा पचका झाला..,ढोंग उघडे पडले ; राऊत म्हणाले, "‘देशबुडव्यांच्या हाती महाराष्ट्र..’

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला गिळत होती म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे सांगायची सोय आता राहिली नाही.
 Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे भाजपाचा पदर पकडत शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार त्यांच्या या कृतीमुळे ‘दादा’ राहिले नाहीत. त्यांचे दादापण संपले आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. आजच्या (रविवार) 'सामना'तील 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राजकीय भूकंपावर भाष्य करताना छगन भुजबळ तसेच अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘देशबुडव्यांच्या हाती महाराष्ट्र’ गेलाय असं राऊतांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाचे मिळून 165 आमदारांचे बहुमत असतानाही भाजपने (BJP) अजित पवारांना फोडले आणि बहुमत जोडले यामुळे सगळ्यात मोठा पचका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांचा झालाय’ असा चिमटा राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना काढला आहे.

 Eknath Shinde, Sanjay Raut
Supreme Court : सोळा आमदार अपात्रतेचा मुद्दा.. ; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी अपडेट..

"महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाचे मिळून 165 आमदारांचे बहुमत असतानाही भाजपने अजित पवारांना फोडले व आणखी चाळीस आमदार बहुमतास जोडले. यामुळे सगळय़ात मोठा पचका झाला तो मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या आमदारांचा. त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’च आता संपली. “आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात,” असे भाजपला सुनावणाऱयांची तोंडे आता पडली, हे पहिले व अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला गिळत होती म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे सांगायची सोय आता राहिली नाही. सगळेच ढोंग उघडे पडले," असे राऊत यांनी म्हटलं आहे.

 Eknath Shinde, Sanjay Raut
BJP leaders join BRS : भाजपच्या माजी नगरसेवकांचा बीआरएस मध्ये प्रवेश ; केसीआर यांचे सोलापुरकरांना मोठे आश्वासन..

'रोखठोक'मध्ये संजय राऊत म्हणतात..

  • केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने हे सर्व पक्ष सोडत आहेत. प्रत्येकाची वैयक्तिक कारणे आहेत. ज्यांना जायचे त्यांनी जावे, पण पक्ष म्हणून त्यांना मी पाठिंबा देणार नाही. पवार यांनी तेव्हा एक चांगला मुद्दा मांडला होता

  • “आज जे ईडी वगैरेच्या भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या फायली कधीच बंद होत नाहीत.” हसन मुश्रीफ यांनी भाजपात प्रवेश केला म्हणून त्यांची फाईल बंद केली तर ‘ईडी’ वगैरे यंत्रणांची आधीच घसरलेली विश्वासार्हता कायमची नष्ट होईल.

  • लोकशाहीची धुळधाण, फोडाफोडीचा सीझन-2 असं दि.16/4 च्या रोखटोक सदरात परखडपणे लिहले होते तसेच अजित पवारांसह आमदारांचा मोठा गट लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडेल हे सांगितले, तेव्हा राज्यात व देशात खळबळ उडाली. राष्ट्रवादीतला आमदारांचा एक मोठा गट भाजपात निघाला आहे, हे तेव्हा खुद्द श्री. शरद पवार यांनी मान्य केले.

  • राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी मांडलेली कैफियत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांचा केलेला घोटाळ्याचा आऱोप, ईडी, सीबीआय या सर्व मुद्दयावर सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आले असून देशबुडव्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हास्यजत्राच केली आहे!

  • भाजप विरोधक हे देशबुडवे आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमधून केला व पुढच्या 72 तासांत महाराष्ट्रातील देशबुडव्यांनी भाजपशी हातमिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची भाजपची तयारी दिसते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांचे पक्ष फोडण्याची त्यांना चटक लागली आहे!’

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com