Sanjay Raut : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात वादाची ठिणगी पडली. भाजप, मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी आंदोलन केले. या प्रकरणाला काही तास उलटले असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन पुन्हा राजकारण चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसोबतच (BJP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जहरी टीका केली आहे.
स्वाभिमानाचं तुणतुण वाजवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान, ७२ तास झाले महाराजांचा अपमान करुन पण मुख्यमंत्री आणि त्यांचे चाळीस नेते साधा निषेध करु शकले नाहीत इतके तुम्ही घाबरताय, महाराजांचा हा अपमान पाहता तुम्ही राजीनामे द्यायला पाहिजे होते, कारण हा भाजपने केलेला अपमान आहे, असही राऊत यांनी म्हटलं आहे.
आम्ही महाविकास आघाडीत गेलो म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष फोडला, इथे तर भाजप आणि त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे महाराजांचा अपमान केला आहे. राज्यपालांनी एका वर्षात चार वेळा शिवाजी महाराजांच्या अपमान केला आहे. महाराजांनी त्यांनी माफीवीर म्हटलंय तरीही तुम्ही सत्तेला चिटकून बसलेले आहात, महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, अशी जहरी टीकाही राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.
भाजप राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी एका राष्ट्रीय चॅनेलवर शिवरायांनी पाच वेळा औरंगाबाजेबाची माफी मागितली, हे तुमच्या नजरेतुन का सुटतयं, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, संभाजी राजे यांचा वारंवार अपमान करायचा, शिवरायांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण ते भाजपचे सहयोगी आहेत. वीर सावरकरांच्या बाबतीत तुम्ही रस्त्यावर उतरले त्यासाठी तुमचं स्वागत आहे. जोडेही मारले, मग आता तुम्ही कोणाला जोडे मारणार, भाजपच्या प्रवक्त्याला मारणार की राज्यपालांना मारणार, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.