Sanjay Raut On Ayodhya : 'भाजपकडून प्रभू श्रीरामालाच निवडणुकीत उभं करण्याचं बाकी'; राऊतांनी पुन्हा डिवचलं!

Sanjay Raut About Lord Shriram : 'रामाच्या नावावर स्वार्थाचे राजकारण...'
Sanjay Raut On Ayodhya
Sanjay Raut On AyodhyaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणेची लगबग सुरू आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या यादीवरून राजकारण सुरू आहे, अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या आजच्या दौऱ्यात वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. यावर आता विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Ayodhya
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा आणि मोदींच्या आजच्या दौऱ्यावरून राऊतांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. रामाच्या नावावर स्वार्थाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे. 'भारतीय जनता पक्षाकडून प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी आहे. एवढे प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे,' असा थेट टीकेचा बाण राऊतांनी भाजपवर सोडला. आता राऊतांच्याया च विधानावरुन भाजप आणि राऊत असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut On Ayodhya
Uddhav Thackeray News : 'सत्तेची भीती वाटते ती सत्ता काय कामाची', उद्धव ठाकरे कडाडले

महाविकास आघाडीत समन्वय

संजय राऊत म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत ज्या काही वावड्या उठत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका. आघाडीत जागावाटपाबाबत समन्वय आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. राज्यातल्या 48 जागांवर मेरिटनुसारच आघाडी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. जिंकेल त्यांची जागा हे सूत्र सुरुवातीपासूनच आहे. शिवसेनेची (ठाकरे गट) भूमिका कायम राहिली की 23 जागा लढवणारच, याच्यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही,' असे संजय राऊत म्हणाले.

'मातोश्री'वर जागावाटपाची चर्चा

'वंचित बहुजन आघाडी'शी आमची चर्चा सुरू आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर आले होते. आमच्यात दोन-अडीच तास जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली. यावर एकत्रितपणे चर्चा होत राहिल. काही लोक अफवा पसरवत आहेत, ते चुकीच्या आहेत, असेही राऊत म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com