Piyush Goyal Vs Sanjay Raut : पीयूष गोयल अन् संजय राऊत भिडले; काय आहे कारण?

Sharad Pawar Vs Amit Pawar : गोयल यांच्यावर काय आरोप आहेत, हे सांगायला लावू नये. शरद पवार हे सत्यच बोलले आहेत.
Piyush Goyal, Sanjay Raut
Piyush Goyal, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : पुण्यातील भाजप अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारींचे सरदार अशी टीका केली होती. त्यावर पवारांनीही, ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केले, त्याच्या हातात देशाचे गृहमंत्रीपद आहे, अशी सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

पवारांच्या टीकेनंतर राज्यातील भाजपचे नेते चांगलेच खवळल्याचे दिसत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पवार यांना लक्ष्य केले. यात वादात आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

शाह यांच्यावरील तडीपारीच्या कारवाईत शरद पवारांचे Sharad Pawar षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यूपीए सरकारचे मोठे नेते होते. त्यावेळी तत्कालीन यूपीए सरकारने शाह यांच्यावरील आरोपांचे खंडन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.

अमित शाह यांच्यावरील केस खोटी, बिनबुडाची असल्याचे कोर्टाच्या निर्णयात तसे नमूद केले आहे. कोर्टाने या केसचे पर्दाफाश केल्याचा दावा करत गोयल यांनी शाह यांच्यावरील तडीपारीच्या षडयंत्रात शरद पवारांचाही हात असल्याचा आरोप केला आहे.

पीयूष गोयल Piyush Goyal यांच्या या आरोपांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत प्रश्नांची सरबत्ती केली. गोयल यांच्यावर काय आरोप आहेत, हे सांगायला लावू नये. शरद पवार हे सत्यच बोलले आहेत. अमित शहांवरील सगळे खटले मोदी सत्तेत आल्यानंतर काढून घेतले गेल्याचा दावा राऊतांनी केला.

Piyush Goyal, Sanjay Raut
Manda Mhatre Vs Ganesh Naik : माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाय! मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांना इशारा

अमित शाह Amit Shah यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही, अमित शहांना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती नाही, ते तुरुंगात होते की नाही, त्यांच्यावरील खुनाचा खटला होता, तो गुजरातच्या बाहेर चालवावा याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही, आदी प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. पीयूष गोयल यांनी इतकही खोटे बोलून नये, की केंद्रीय मंत्री म्हणून लोक त्यांना हसतील, असा टोलाही राऊतांनी लगावला.

दरम्यान, पवारांनी शहांवर केलेली टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची शहांवरील टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे असल्याचे म्हटले. त्यावर पवारांनी पुन्हा एकदा, हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला आहे, असा पलटवार केला.

यावर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी, 'शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवारांना माहीत असायला पाहिजे होता, असे म्हटले.

Piyush Goyal, Sanjay Raut
Pankaja Munde : जरांगेंमुळे भाजपचं नुकसान होत आहे? पंकजा मुंडेंनी मोजक्या शब्दांत दिलं उत्तर; म्हणाल्या, सध्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com