Manda Mhatre Vs Ganesh Naik : माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाय! मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांना इशारा

Belapur And Sandip Naik : बेलापूर मतदारसंघातून सलग दोन टर्म आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना यावेळी भाजपचेच गणेश नाईक आव्हान देत आहेत.
Manda Mhatre
Manda MhatreSarkarnama
Published on
Updated on

New Mumbai Political News : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात रस्सीखेच वाढल्याचे दिसून येत आहे.

बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी संपर्क कार्यालय सुरू केल्याने मंदा म्हात्रे चांगल्याच चिडल्या आहेत. त्यांनी थेट गणेश नाईकांना उद्देशून नाद पूर्ण करण्याची भाषा वापरल्याने भाजप अंतर्गत वाद मिटवताना वरिष्ठांच्या नाकी नऊ येणार असल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांचे चिरंजीव संदिप नाईक यांनी बेलापूर येथे आपल्या जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यानंतर आज एका कार्यक्रमात बोलताना मंदा म्हात्रेंनी संदीप आणि गणेश नाईकांना फैलावर घेतले.

म्हात्रे म्हणाल्या, बेलापूरच्या जनतेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र आज काही जण या भागात आपली कार्यलये थाटत आहेत. आणि म्हणतात आम्ही आमदार बनणार. अरे तुमच्या बापाला मी हरवून बसले. आता मी शांतपणे जनतेची कामे करत आहे. पण माझ्या नादाला कुणी लागलं तर त्यांचा नाद खुळा केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दात म्हात्रेंनी नाईकांवर टीका केली आहे.

दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी म्हात्रे यांनी वाशी येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेसह भाजपचेही मातब्बर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पक्षाचे बडे नेते गणेश नाईक यांच्यासह त्यांचा एकही समर्थक तेथे उपस्थित नव्हते. नाईकांची ती अनुपस्थितीच आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपमधील दादा-ताईमधील वाद स्पष्ट करणारी ठरली.

Manda Mhatre
Ravindra Chavan On Ganpat Gaikawad : कल्याण पूर्वमध्ये भाजपचा दावा कायम; गणपत गायकवाडांबाबत रवींद्र चव्हाण म्हणाले...

बेलापूर मतदारसंघातून सलग दोन टर्म आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना यावेळी भाजपचेच गणेश नाईक आव्हान देत आहेत. या मतदारसंघातून आपले पुत्र, माजी आमदार पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारीसाठी नाईकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्याच हेतूने लोकसभेनंतर संदीप नाईक यांनी बेलापूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी येथे आपले जनसंपर्क कार्यालयही सुरू केले आहे.

बेलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी संदीप नाईक यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रथम आपले मतदान ऐरोलीतील बोनकोडे या गावातून बेलापूर येथे ट्रान्सफर केले आहे. त्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसह प्रभागनिहाय दौरे केले आहेत. त्यांच्या या आक्रमक हालचालींमुळे मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Manda Mhatre
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा; नितीशबाबू, लालूंना ‘दे धक्का’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com