अफझल गुरू, बुरहान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना भाजपचे पाठबळ- संजय राऊत

BJP| Mehbooba Mufti| Terrorist| मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजप जबाबदार
Sanjay raut- Mehbooba Mufti
Sanjay raut- Mehbooba MuftiSarkarnama

मुंबईः मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या चांगल्या मैत्रिण आहेत. दहशतवादी अफझल गुरू आणि बुरहान वाणी यांना पाठिंबा देऊनही, भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सरकार बनवले. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना बळ दिले. आज मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजपच (BJP) जबाबदार आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे.

ते मुंबईत बोलत होते. मेहबुबा यांच्या पक्षाने नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थन केले आहे. असे असतानाही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. याच काळात काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची मागणी करत आहेत. भाजपनेच या मेहबुबा मुफ्तींना बळ दिले. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay raut- Mehbooba Mufti
IT Raid: यशवंत जाधवांनी दिले 'मातोश्री'ला दिले दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तास काम करतात आणि फक्त दोन तास त्यांना झोप मिळते, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना जी २ तास झोप मिळते, तीही मिळू नये आणि त्यांनी २४ तास देशाची सेवा करावी, यासाठी प्रयोग सुरू झाले आहेत, असे पाटील यांचे म्हणाले. हे ऐकून पंतप्रधानांची खरोखरच दोन तासांचीही झोप उडाली असेल, ही तर चमचेगिरीची हद्द झाली. अशी चमचेगिरी या देशात कधीही बघितली नाही. ,'' असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान, २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यापासून दररोज भाजप शिवसेनेत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खटके उडत आहेत. यात एक मुद्दा म्हणजे हिंदूत्त्ववादाचा. शिवसेना आणि भाजप गेल्या २५ वर्षांपासून हिंदूत्त्ववादाच्या मुद्द्यावर युतीत होते. मात्र २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणाचा यावरून या दोन्ही पक्षात चढाओढ लागली असते.

मात्र, भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत केलेली युती आणि उपभोगलेली सत्ता यावरून शिवसेनेने नेहमीच भाजपवर तोंडसुख घेतले आहे. अता गेल्या आठवड्यापासून द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून देशभरात राजकारण सुरू झाले आहे. त्यावरुन संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा भाजपला फटकारलं आहे. त्यावर आता भाजपकडून काय उत्तर मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com