Sanjay Raut म्हणाले, तिथे माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बुधवारी (३० नोव्हेबर) सुनावणी होणार आहे. या दोन्ही राज्यात हा वाद मोठ्या प्रमाणात पेटला असतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर दावा केला आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.

यावर, बेळगावमध्ये बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचलला जात असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. २०१८ मध्ये केलेल्या भाषणावरुन माझ्यावर आता गुन्हे दाखल होतात आता वॉरंट पाठवतात. याच्यावरही राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, माझी लढाई ही व्यक्तिगत नव्हती ती महाराष्ट्रासाठी होती. आता तर पुन्हा महाराष्ट्रावरील हल्ले वाढले आहेत. विशेषत: गेल्या तीन महिन्यात हे सरकार अस्तित्त्वात आल्यापासून हे आक्रमण जास्तच वाढलं आहे. याचा परिणाम फार वेगळा होईल, यात आम्हाला गांभीर्याने लक्ष घालावे लागेल. पण मी पूर्ण तयारी आहे. मला माहिती आहे. मी घाबरणार नाही. मी नक्कीच जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
Maharashtra-Karnataka border dispute: मुख्यमंत्री बोम्मई दिल्लीत दाखल; मुकुल रोहतगींशी चर्चा करणार

दरम्यान, याच प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेणार आहेत. या प्रश्नांसंदर्भात बोम्मई हे रोहतगी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे सीमावादावरून कर्नाटक सरकारने आपली रणनीती वेगाने आखण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांची चर्चा केली आहे. त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. सीमाप्रश्नावर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. वैद्यनाथन यांची निवड केली आहे. ते महाराष्ट्राची खिंड सर्वोच्च न्यायालयात लढवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com