मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) - कर्नाटक (Karnataka) सीमावादाच्या (border dispute) संदर्भात आता वेगवान घडामोडी घडत आहेत. सीमा प्रश्नाबाबत उद्या (बुधवारी, ता. ३० नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे आज (ता. २९ नोव्हेंबर) सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांची भेटणार घेणार आहेत. (Maharashtra-Karnataka border dispute: CM Bommai arrives in Delhi; He will discuss with Mukul Rohatgi)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. या वादावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही राज्यात हा वाद मोठ्या प्रमाणात पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील काही गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर दावा केला आहे. त्याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहे.
दरम्यान, याच प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेणार आहेत. या प्रश्नांसंदर्भात बोम्मई हे रोहतगी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे सीमावादावरून कर्नाटक सरकारने आपली रणनीती वेगाने आखण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांची चर्चा केली आहे. त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. सीमाप्रश्नावर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. वैद्यनाथन यांची निवड केली आहे. ते महाराष्ट्राची खिंड सर्वोच्च न्यायालयात लढवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.