Sanjay Raut News : 'राहुल नार्वेकरांना चोरांचे सरदार व्हायचे आहे का?'; राऊतांचा रोखठोक सवाल

Sanjay Raut On Rahul Narvekar : आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSarkarnama

Maharashtra Politics News : 'चोर आणि लफंगे हे सरकार चालवत आहेत. अशा चोर आणि लफंग्यांना घटनात्मकपदावर बसलेली व्यक्ती जर संरक्षण देत असेल, तर या देशात आणि राज्यात काय चाललंय? याची कल्पना न केलेली बरी', असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे .

MLA Disqualification Case
MLA Disqualification News : आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात मोठी अपडेट; राहुल नार्वेकर घेणार 'ही' भूमिका ?

'विधिमंडळाचे अधिकार, विधिमंडळाचे सार्वभौमत्व, हे वारंवार राहुल नार्वेकर सांगत आहेत. याचा अर्थ असा नाही की चोरी करून एखाद्याने दुसऱ्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकानं त्या चोराला आणि खुन्याला संरक्षण द्यावं. अशी या सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही. मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ४० आमदार आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीचेही जवळपास तेवढेच आमदार हे बेकायदेशीरपणे मूळ घरातून चोरी करून दुसऱ्या घरात शिरलेले आहेत. आणि त्या चोरांना दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील, तर राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. भगतसिंह कोश्यारींनंतर राहुल नार्वेकर हे नाव असेल. उद्या जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं अवघड होईल. या राज्याची जनता माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे हे लोकशाहीचे हत्यारे आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाने मर्यादेनुसार त्यांना बरखास्त करण्याची ही जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षांवर सोपवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्यावर गुन्हेगाराला फाशीवर लटकवण्यासाठी एका जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लवटकवत नाही. ते जल्लादाचं काम करण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षांवर आहे. तुम्हाला ४० आणि ४० अशा एकूण ८० आमदारांना घटनात्मकदृष्ट्या फासावर लटकवावचं लागेल. तुम्ही कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी या आमदारांची सुटका नाही', असे संजय राऊत म्हणाले.

'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात? हे त्यांनी ठरवायला पाहिजे. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदाराची गरज नाही. या महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदाराची गरज आहे. चौकीदार चोर आहे तसेच घटनात्मकपदावर बसलेले चोर आहेत, असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

MLA Disqualification Case
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना थेट ऑफर!; भाजप आमदाराच्या विधानाने राज्यभर चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com