Sanjay Raut : ''...म्हणून गृहमंत्र्यांनी 'सासुरवाडी'ला न्याय द्यावा!'' ; संजय राऊतांचा शाहांना टोला

Sanjay Raut : न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडू शकते तर...
Amit Shah, Sanjay Raut .jpg
Amit Shah, Sanjay Raut .jpgSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंमध्ये दिल्लीत बैठक होणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाह यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit shah) हे महाराष्ट्राचे जावई आहेत. हे आपल्याला माहितीय. त्यांच्या पत्नी ह्या कोल्हापूरच्या आहेत. आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरलाच बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष कोल्हापूरला होतो कारण सीमा आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत त्यांना जास्त माहिती असणार आहे.

Amit Shah, Sanjay Raut .jpg
Eknath Shinde : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात शिंदे सरकारचा मोठा निर्णय..

दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि कर्नाटकात सरकारच संपूर्ण भाजपचं आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री असे म्हणतात की अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही. पण आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांना भेटून फायदा आहे. हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना आहे.

सीमा भागामध्ये कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालत आहे. तिकडे कायदा सुव्यवस्थेसाठी राज्य पोलीस दलाचा पोलीस फाटा मागे घेऊन सेंट्रल फोर्स तैनात केली पाहिजे. हे केंद्रीय गृहमंत्रीच करू शकतात. आणि त्यांनी ते करावं. आता पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी सीमावादाबाबत मध्यस्थी करुन तोडगा काढायला हवा. कारण दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत तर कर्नाटकात संपूर्ण भाजपचं सरकार आहे.

Amit Shah, Sanjay Raut .jpg
Navneet Rana : राणा दांपत्यानं करुन दाखवलं! अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची अखेर बदली

न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत, म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? न्यायालय हे राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडू शकते कारण तो राजकीय प्रश्न होता.मात्र, वीस ते पंचवीस लाख मराठी लोकांचा प्रश्न ज्यावर न्यायालय तारखावर तारखा देतंय... जर न्यायालयात राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, सरकारच्या इंटरेस्टचे प्रश्न सुटू शकतात, मात्र सीमा प्रश्न असेल महाराष्ट्रच्या बेकायदेशीर सरकारचा प्रश्न असेल त्यावर तारखा तारखा येतात त्यामुळे संशय निर्माण होतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com