ईडीकडून संजय राऊतांची मालमत्ता जप्त

Sanjay Raut| ED| एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई
संजय राऊत
संजय राऊतसरकारनामा

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊतांना ईडीच्या कारवाईची पूर्व कल्पना होती. पूर्वकल्पना असल्यानेच त्यांनी ५५ लाख परत केले होते. कारवाई होणार म्हणून राऊतांचा हा खटाटोप सुरु होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारायला हवा होता. असेही त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. यांना वाटत पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू शकतात. ही कारवाईची सुरुवात आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम आहे, असंही सोमय्या यांनी म्हटले आहे.

संजय राऊत
ST Strike: त्रिसदस्यीय समिती आज पुन्हा अहवाल देणार

या कारवाईवर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते, गांधीजी आज परत मरण पावले, असे म्हणत प्रतिक्रीय दिली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीसरकार पडावे, यासाठी ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ईडीच्या या कारवाईची पुर्वकल्पना होती. माझ्यावर राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला गेला. सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आली आहे. पण अशा कारवायांमुळे संजय राऊत तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहेय

ईडीने जप्त केलेली संपत्ती ही कष्टाने कमावलेली संपत्ती आहे. त्यातील एक रुपयाची संपत्ती अवैध मार्गाने, चूकीच्या मार्गाने कमावलेली सापडली, असेल तर ती सर्व संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करेल असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, जर आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल, पण सुडाच्या कारवायांना घाबरणार नाही, असेही त्यांनी नमुद केलं.

५५ लाखाच्या कर्जाची माहिती शपथपत्रात नमुद केली आहे. पण त्यांनी माझ्यावर आणि राज्यातील इतर मंत्र्यांवर कारवाई करुन त्यांनी स्वत:ची कबर खोदायला सुरुवात केली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com