Sanjog Waghere In Shivsena : अखेर संजोग वाघेरे शिवबंधनात; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंना पाहून भावूक...'

Sanjay Waghere At Matoshree : पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या विरोधात ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम?
Sanjay Waghere In Shivsena :
Sanjay Waghere In Shivsena :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे संजोग वाघेरे-पाटील यांनी आज अखेर 'मातोश्री'वर हजेरी लावत शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथले अजित पवारांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी ठाकरेंच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून घेतले. यावेळी वाघेरे भावूक झाले होते. (Latest Marathi News)

Sanjay Waghere In Shivsena :
Nanded NCP News : अजितदादांकडून नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना बळ, सहाजणांची `डीपीडीसी`वर नियुक्ती..

या पक्षप्रवेशाच्या वेळी वाघेरे म्हणाले, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी.. या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात कामाच्या धडाक्यात जी सुरूवात केली, मी त्याच वेळी साहेबांवर (उद्धव ठाकरे) भावूक झालो होतो. त्यामुळे आज मी इथे उपस्थित आहे. खासदार संजय राऊत हे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात."

आज देशात अनेक प्रश्न आहेत. भ्रष्टाचार आहे, महागाई आहे. या प्रश्नांवर या पुढे शिवसेनेतून काम करणार आहे. या सगळ्याचा विचार करूनच आज शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं, असं ठरलं. त्यानुसार आज मी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे वाघेरे म्हणाले.

Sanjay Waghere In Shivsena :
जागावाटपाचा तिढा, काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांना जागा दाखवली | Sanjay Raut vs Sanjay Nirupam

राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली?

राष्ट्रवादीत मतभेद झाल्याने वा नाराज असल्याने पक्ष सोडत नसल्याचे वाघेरेंनी स्पष्ट केले. बऱ्याच दिवसांपासून हा विचार मनात घोळत होता, असे ते म्हणाले. सत्ताधारी भाजप वा शिंदे शिवसेनेत न जाता विरोधी पक्ष ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश का करीत आहात, अशी विचारणा केली असता, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून त्याचवेळी महिला सुरक्षा, शेतकरी, कामगारांचे प्रश्नही आ वासून उभे आहेत. ते सरकार सोडवत नसल्याने ते धसास लावण्यासाठी आणि ठाकरे यांचे विचार पटल्याने शिवसेनेत जात आहे, असे वाघेरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com