संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Kolhapur District Central Bank election) निकाल समोर आला आहे.
Kolhapur District Central Bank election Result 

Kolhapur District Central Bank election Result 

Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur District Central Bank) निवडणुकीत विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील (Santosh Patil) भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील (Ranjitsingh Patil), आजरातून सुधीर देसाई (Sudhir desai), शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

जिल्हा बँकेची मतमोजणी आज महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरूवातीला ४० मतदान केंद्रावरील विकास संस्थ गटासह इतर गटातील मतपत्रिकांचे वर्गीकरण करून विकास संस्था वगळता इतर गटातील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर दहा वाजता प्रत्यक्ष विकास संस्था गटातील मतमोजणीला सुरूवात झाली.

<div class="paragraphs"><p>Kolhapur District Central Bank election Result&nbsp;</p></div>
छगन भुजबळांनी फटकारले, `काळजी घ्या, कारवाईची वेळ आणू नका`

भुदरगड विकास संस्था गटात रणजित पाटील यांना १४४ तर त्यांचे विरोधक यशवंत नांदेकर यांना ६२ मते मिळाली. शाहुवाडी विकास संस्था गटात रणवीर गायकवाड यांना ६६ तर संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना ३२ मते मिळाली. गडहिंग्लज विकास संस्था गटात १०६ पैकी तब्बल १०० मते घेऊन संचालक संतोष पाटील यांनी सलग दुसऱ्यांना या तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रवेश केला. त्यांचे विरोधक व बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांना केवळ ६ मते मिळाली. यातील सुधीर देसाई, रणवीर गायकवाड हे पहिल्यांदाच बँकेत आले आहेत. देसाई यांचे वडील दिवंगत राजाराम देसाई यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com