ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाची वैद्यकीय तपासणी

आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्या आठ जणांपैकी तीन जणांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Aryan Khan- NCB
Aryan Khan- NCB Twitter/@ANI hindi news
Published on
Updated on

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने (NCB) शनिवारी रात्री एका लक्झरी क्रुझवर छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान इतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी अंती आज दुपारी एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह मुनमुन धामेचा आणि मुनमुन धामेचा यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. यात 1) मुनमुन धामेचा, 2) नुपूर सारिका, 3) इस्मीत सिंग, 4) मोहक जसवाल, 5) विक्रांत चोकर, 6)गोमित चोप्रा, 7) आर्यन खान, 8) अरबाज मर्चंट आदींचा समावेश आहे.

Aryan Khan- NCB
Cruise Drugs Party: आर्यन खानसह आठ जणांवर गुन्हा दाखल

एनसीबीनेे या कारवाईत,20 ग्रॅम कोकेन, 30 ग्रॅम चरस, 10 ग्रॅम एमडी, आणि 20 ग्रॅम टॅबलेट्स जप्त करण्यात आलं आहे. या आठजणांची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनसीबीचे समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मला या पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होत. आपल्याकडून क्रुझरवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं स्पष्टीकरण आर्यन खानने दिलं होतं.

नसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावून बोलावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com