Thackeray - Fadnavis Meet: ठाकरे-फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? शंभूराज देसाई म्हणाले…

Shambhuraj Desai : शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Uddhav Thackeray and Devndra Fadnavis News
Uddhav Thackeray and Devndra Fadnavis NewsSarkarnama

Devendra Fadnavis News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (२३ मार्च) विधीमंडळाच्या गेटवर भेट झाली. या भेटीवर शिवसेना (Shivsena) नेते मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज विधीमंडळात एकत्रच प्रवेश केला. सत्तापालट झाल्यावर ठाकरे-फडणवीस एकमेकांना पहिल्यांदाच भेटले हे पाहून बरे वाटले असते. मात्र तेव्हा मी सभागृहात होतो. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी गप्पाही मारल्या. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले.

Uddhav Thackeray and Devndra Fadnavis News
PCMC News : विधानसभेत आमदार अश्विनी जगतापांनी उठवला आवाज; चिंचवडबरोबरच मावळसाठीही केली महत्त्वाची मागणी

यावर बोलताना देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहून बरे वाटले. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितले असेल, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला आहे. तर, तुम्ही आता शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम करा, असे फडणवीसांनी म्हटल्याची चर्चा विधिमंडळाच्या आवारत होती, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे शिंदे गटात चलबिचल आहे, असे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, असे विचारले असता, देसाई म्हणाले, आमच्या लोकांच्या चालण्यात, बोलण्यात कुठे जाणवते का? आम्ही अधिवेशनाचे आणि दिलेल्या विभागाचे काम करत आहेत. चलबिचल आणि चिंता करण्याचे काम नाही.

Uddhav Thackeray and Devndra Fadnavis News
Uddhav Thackeray News: ठाकरे-फडणवीस शंभर पाऊलच एकत्र चालले; पण इशारा कुणाला, शिंदेंना की आघाडीला?

उलट सरकार पडेल म्हणून महाविकास आघाडी तारखावर तारखा देत आहे. मात्र, अजूनही सरकार पडलेले नाही. फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम असल्याचेही देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com