शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांना ४ दिवसात २ वेळा भेटले; अखेर ठाकरेंनी पवारास्त्र वापरले!

Uddhav Thackeray | Rajya Sabha | Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची फोनवरुन चर्चा
Sharad Pawar-Hitendra Thakur-uddhav Thackeray
Sharad Pawar-Hitendra Thakur-uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

विरार : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची बुधवारी सायंकाळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा भेट घेतली. खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे या नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीही आमदार सुनिल राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी ठाकूर यांची भेट घेतली होती.

मात्र त्यानंतरही हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला कोणतीही शब्द न दिल्याने अखेर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'बविआ'ची मत महाविकास आघाडीच्या बाजूने वळविण्यासाठीची सारी सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ्य नेते शरद पवार यांच्याकडे सोपविली आहेत. आज संध्याकाळी हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची फोनवरुन चर्चा झाली. जवळपास २ मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली.

हितेंद्र ठाकूर हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना असल्याने शेवटच्या क्षणी या सर्व प्रक्रियेत ते पवारांना उत्तरवतील, असे अंदाज राजकीय निरीक्षकांमधून व्यक्त होत होते. राज्यसभेसाठी एकेक मताची बेगमी ठरण्यासाठी भाजप आणि शिवसेना प्रयत्न करत आहेत. दोघांच्याही विजयाची भिस्त आता अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांवर दोन्ही बाजूंचा डोळा आहे. (Chief Minister Uddhav Thackeray will seek Sharad Pawar's help at last minute)

नुकतीच भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. दरम्यान या सर्व भेटीगाठींवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच पक्षात माझे मित्र असल्याने सर्वजण भेटायला येत असतात. राज्यसभेची निवडणूक असल्याने मतांसाठी सारेजण येत असतात. धनंजय महाडिक आले होते, तर संजय पवार यांच्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आले होते. राज्यसभेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा, ते योग्यवेळी जाहीर करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com