मुंबई : ''लखीमपूर खीरी हिंसाचारात मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं. यात शेतकऱ्यांनी हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने यात भूमिका घेणे गरजेचे होते. पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते. पण उत्तर प्रदेश सरकारला अद्यापही याबाबत मैान आहे. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टाळता येणार नाही, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
लखीमपूर खीरी प्रकरणावरुन (Lakhimpur Khiri Violence) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, ''मावळ येथील घटनेला कुठलाही राजकीय पक्ष जबाबदार नव्हता, तर या घटनेला पोलिस जबाब होते. येथील स्थानिक भाजपच्या नेत्यांना याबाबत चिथावणी दिल्याने हा प्रकार झाला होता. त्यानंतर मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळे तिथं भाजपच्या उमेदवारांना टाळले. तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला,''
शरद पवार म्हणाले की, चीनसोबत १३ बैठका झाल्या पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणे महत्वाचे आहे. केंद्राकडून काही यंत्रणाचा सतत गैरवापर केला जात आहे. केद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.''
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंड : दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना युतीचा नगरसेवक राजेश जाधव (NCP corporator Rajesh Jadhav) यांच्याविरूध्द बेकायदा खासगी सावकारी आणि विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात राजेश जाधव याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ (अ) ( क) आणि भारतीय दंड विधान ३५४ (विनयभंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.