Sharad Pawar : 'नगर जिल्हा बँकेत काय शिजतंय...'; विखेंना टोला लगावत पवारांनी थोरातांकडे व्यक्त केली चिंता

Sharad Pawar comment on Nagar District Cooperative Bank in Mumbai : मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थित उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ अनावरण झाले. या कार्यक्रमात शरद पवारांनी नगर जिल्हा सहकारी बँकेत्या भवितव्याविषयी काळजी व्यक्त केली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेविषयी बाळासाहेब थोरातांकडे चिंता व्यक्त केली आहे. "बाळासाहेब, मला नगर जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागलीय, असे म्हणत, आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत, त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजतंय ते सगळ्यांना माहिती आहे", असा टोला शरद पवार यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

जी. एस. महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे (Bank) माजी अध्यक्ष (कै.) उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत झाला. त्यावेळी त्यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भवितव्याविषयी मोठे विधान केले.

तसंच सॉलिसीटर (कै.) गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव (कै.) उदय शेळके यांनी सहकारात दिलेल्या योगदानाची आठवणींना उजाळा दिला. या दोघांनंतर बँकेची धुरा संभाळत असलेल्या गीतांजली शेळके यांचे कौतुक करत बँकेविषयी कोणताही प्रश्न असेल, अडचणी असतील, तर मांडत चला, त्यावर मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करेल, अशी शरद पवार यांनी ग्वाही दिली.

Sharad Pawar
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; जिल्हाध्यक्षासह युवा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुंबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खासदार नीलेश लंके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar
Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांचे विधान; रोहित पवारांची शक्यता खरी ठरणार; विधानसभेलाही पवार VS पवार सामना रंगणार?

शरद पवार यांनी गुलाबराव यांच्यानंतर उदय आणि त्यांच्यानंतर गीतांजली शेळके यांनी बँकेची जबाबदारी संभाळत आहेत. उदय शेळके यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेचे देखील नेतृत्व केले. महाराष्ट्रात नगर जिल्हा सहकारी बँक देखील दिग्गज बँकेपैकी एक आहे. पण बाळासाहेब थोरात आता या बँकेविषयी काळजी वाटते, असे म्हणत आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजयंत ते सगळ्यांना माहिती आहे, असे टोला लगावला.

नगरमध्ये सहकारी कारखान्याच उगम नगर जिल्हा सहकारी बँक आणि महानगरसारख्या बँकांमुळे झाला. कारखानदारी वाढली. अनेक कारखाने उत्तम चालू आहेत. बाळासाहेबांचा कारखान्याचे व्यवस्थापन उत्तम आहे. लौकीक आहे. बँकेचे काही प्रश्न असतील, तर हक्काने माझ्याकडे या, प्रश्न मांडा, त्यावर मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असे शरद पवार यांनी आश्वासन दिले.

बँकेवर राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी कर्डिले बँकेचे अध्यक्ष आहे. या बँकेत भाजपविरुद्ध विरोधक, असा नेहमीच संघर्ष होतो. बँकेतील कामकाजावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांची करडी नजर असते. त्यामुळे या बँकेतील राजकारणाचा प्रभाव सहकारी कारखान्यावर देखील पडतो. त्यामुळे नगर जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळण्यासाठी सहकारी कारखानदारांमध्ये आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांमुळे चुरस असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com