Sharad Pawar Ajit Pawar meeting : शरद पवार-अजितदादा एकत्र येणार; फडणवीस, गडकरी अन् शिंदे साक्षीदार असणार

Sharad Pawar Ajit Pawar CM Devendra Fadnavis, Nitin Gadkari, Shivsena Eknath Shinde to Meet in Mumbai Political Buzz in Maharashtra : मुंबई इथं शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमात एकत्र येणार असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील.
Sharad Pawar Ajit Pawar meeting
Sharad Pawar Ajit Pawar meetingSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : राज्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी आगामी सहकाराचं राजकारण, तर नाही ना! या नजरेतून राजकीय विश्लेषक पाहू लागलेत. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पेटला.

अजितदादांनी शरद पवार यांची साथ सोडली. त्यामागील राजकारण सर्वश्रुत असतानाच, दोन्ही पवार एकत्र येत असल्याच्या चर्चांना अलीकडे पेव फुटलं आहे. दीड महिन्यात दोन्ही पवार अनेकदा एकत्र आले आहेत. पण भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शरद पवार आणि अजित पवार आज मुंबईत एकत्र येत आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही पवार एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होणार, असे संकेत मिळू लागले आहेत.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार गेल्या दीड महिन्यांपासून सतत विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. राजकीय वर्तुळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना, अजित पवार आणि शरद पवार हे सतत विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात हे विशेष महत्त्वाचे आहे.

Sharad Pawar Ajit Pawar meeting
Tanpure Sugar Factory Election : 'विखे-थोरात' बिनविरोध झाले; मग बंद पडलेल्या, थकीत कर्जातील 'तनपुरे'त एवढा इंटरेस्ट का?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, नवल वाटू नये, असे विधान केले होते. या विधानानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पेव फुटला होता. शरद पवार यांच्या या विधानानंतरही अजितदादा अन् पवारसाहेब एकत्र आले होते.

Sharad Pawar Ajit Pawar meeting
Jalgaon Politics : पुतण्याकडून काकांना दुसरा धक्का देण्याची तयारी, जळगावात घेणार पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज आयोजित कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केले आहे.अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत, जेव्हा त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि अनेक नेते शरद पवारसाहेबांना भेटत असतात, कोणीतरी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. पण आम्ही आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी एकजूट आहोत. आगामी महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक निवडणुका कशा घ्यायच्या यावर आम्ही काम करत आहोत, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीतही चांगले वातावरण असतानाच, महाविकास आघाडीला फटका बसला. परंतु विधानसभा निवडणुकीत बरीच हेराफेरी झाल्या आरोप अनिल देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com