Sharad Pawar News : अखेर शरद पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली होती.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली होती. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाता विरोधात आयपीसीच्या कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.

Sharad Pawar
Grampanchayat Election : हिंगण्यात आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांची कसोटी !

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. पोलिसाच्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारची रहिवाशी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता, असे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Satara Election News: ४९ ग्रामपंचायती बिनविरोध; २४२ पंचायतीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना भिडणार

फोन करणाऱ्या वक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून पवारांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com