Sharad Pawar On Hindenburg : अदानी समूहातील शेल कंपन्यात कोणी गुंतवले हा काँग्रेसने लावून धरलेला मुद्दा, तसेच अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने अदानीसंबंधी जाहीर केलेला रिपोर्ट, यासंबंधी जेपीसीची मागणी करण्यात येत होती. याच मुद्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
हिंडेनबर्ग प्रकरणी विरोधीपक्षांनी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही अनावश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे. जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचेच नेहमी बहुमत राहिले आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे, ते बाहेर येणार नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाडूनच जे काही आहे ते, सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे, असेही पवार म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे मत व्यक्त केले आहे.
हिंडनबर्ग अहवाल संदर्भात शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षांनी एका कंपनीने समोर आणलेल्या अहवालाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व दिले. हिंडेनबर्ग फर्मची तोपर्य़ंत कोणाला नाव ही ज्ञात नव्हते. आम्ही ही त्यांचे नाव ऐकले नव्हते. या प्रकरणात एका उद्योग समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येते.
विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीबाबत शरद पवार म्हणाले, "केवळ जेपीसी समिती स्थापन झाल्याने, हे प्रकरण सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्यामार्फत या प्रकरणी समिती स्थापन झाल्यास, सत्य देशासमोर येईल. या प्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, जेपीसी नेमून त्याने काही फरक पडणार नाही."
'आम्ही जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा आम्हीही सरकारवर टीका करण्यासाठी टाटा बिर्ला या उद्योगपतींवर हल्ला चढवला होता. टाटांनी या देशाच्या विकासात मोठे योगदान बहाल केले आहे. आजकाल टीका करण्यासाठी टाटा-बिर्ला यांच्याऐवजी अदानी, अंबानी यांच्यावर हल्ले होताना दिसत आहे. मात्र अदानी यांचे देशातील ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असंही पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.