Sharad Pawar On Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, 'सर्वांनी एकत्र येवून...'

Congress News : "राज्यघटनेच्या मूळ रचनेवर आघात.."
Sharad Pawar On Rahul Gandhi :
Sharad Pawar On Rahul Gandhi :Sarkarnama

Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व म्हणजेच खासदारकी रद्द करण्यात आली, यानंतर देशभरातलं राजकीय वारतावरण चांगलेच ढवळून निघाले असून, विरोधीपक्षांची यावर तिखट प्रतिक्रिया येत आहेत, तर यावरून काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यासंदर्भात ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar On Rahul Gandhi :
Rahul Gandhi's Disqualification As MP : खासदारकी सोडावी लागलेले राहुल गांधी त्यांच्या कुटुंबातले तिसरे सदस्य

राहुल गांधींची खासदारकी रद्द करताच शरद पवार यांनी याप्रकरणी सूचक भाष्य केले आहे. पवार ट्वीट करत म्हणाले की,'राहुल गांधींवर करण्यात आलेली सदस्यत्व अपात्रतेची कारवाई ही भारतीय राज्यघटनेच्या मूळ रचनेवर आघात करणारी आहे. लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी सर्वांनाच एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar On Rahul Gandhi :
Kapil Sibal On Rahul Gandhi : ...तरच राहुल गांधींची खासदारकी टिकू शकते; कपील सिब्बलांनी सांगितला मार्ग

राहुल गांधीयांची खासदारची रद्द केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

“राहुल गांधींची मांडणी सत्य आहे, आम्ही नेहमी सत्य मांडत राहू. मात्र हे त्यांना पचवता येत नाही. राहुल गांधींची सदस्यता रद्द केल्यामुळे सरकारपुढील समस्या संपल्या अलं त्यांना वाटत असेल, मात्र या त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची (संसद संयुक्त समिती) मागणी करत राहू. लढत राहू. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये राहावं लागलं तरी आम्ही, जेलमध्ये जायला तयार आहोत, असे खर्गे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com