
दिल्ली : दिल्ली येथे राष्ट्रवादी युवकची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. देशातील सद्यस्थितीच्या राजकीय वातावरणात या बैठकीत अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील एक अनुभवी आणि संसदीय राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. भारताचे संरक्षण व कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात अलौकिक योगदान त्यांनी दिले असून भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते व केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष पदावर प्रभावी काम केले असून देशाच्या सध्याच्या कठीण राजकीय काळात काँगेससह (Congress) इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व पवार यांनी केले पाहिजे, असा सर्वसंमतीने ठराव राष्ट्रीय युवक कार्यकारणीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देशात विशिष्ट प्रकारचे जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण तयार केले जात असून हे ध्रुवीकरण देशाच्या एकतेला व सुरक्षेला घातक आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमर्याद सत्तेच्या बळावर भाजपा (BJP) सत्तेत नसलेल्या घटक राज्यांना वारंवार त्रास देत आहेत. GST कायद्याच्या माध्यमातून देशातील जवळपास १२-१३ राज्यांची आर्थिक कुचंबणा केंद्र सरकारने केली आहे. तर, केंद्रीय तपास यंत्रणाच्या मध्यामातून देशातील भाजपा सत्तेवर नसलेल्या राज्याची बदनामी आणि भाजपाच्या धोरणांवर बोलणाऱ्या राजकीय नेत्यांचा बदला घेण्याचे राजकारण राज्यपाल यांच्या माध्यमातून विविध राज्यात तयार केले आहे. राज्यपालांच्या माध्यमातून समांतर सत्ता केंद्र निर्माण करून घटनात्मक गोंधळ तयार करण्याचे काम भाजपाने केले आहे, असा आरोप भाजपवर करण्यात आला.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर, राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सचिव के. जोस मोहन केरळचे राष्ट्रवादी विधिमंडळ नेते के थॉमस, राष्ट्रीय युवक सरचिटणीस मुरली पांडे, राष्ट्रीय सचिव अफजल कंजुमन, राष्ट्रीय सचिव अमीरजोथ पुरवाला राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब शेख कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष पंकज बोराडे आणि देशातील सर्व राज्यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.