NCP leader Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरु आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लवकरच पवार हे भाजपसोबत जातील अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचदरम्यान,आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर मोठं भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अजित पवारांच्या चर्चांवर मोठं विधान केलं आहे. पवार म्हणाले, अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही असं स्पष्ट करतानाच पक्षातील सर्व सहकारी एक विचारानं पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे सध्या त्यांच्या भागात आहेत. दुसरे नेते अजित पवार हे बाकीच्यांना मार्गदर्शन करत आहेत. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हांला फाटे फोडण्याचा अधिकार नाही. याचवेळी अजित पवारांविषयीच्या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं सांगतानाच कोण काय म्हणतं त्यापेक्षा मी काय म्हणतो याला महत्व असंही पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आमदारांची यादी योग्यवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजितदादांना 'या' आमदारांचा जाहीर पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही. तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके व माणिकाराव कोकाटे यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील घडामोडी आणखी कोणत्या दिशेला जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.